Jump to content

अथर्वशिरोपनिषद

हे उपनिषद अथर्ववेदाशी संबंधित आहे. याच्यात सात कंडिका आहेत. कंडिका क्रमांक १, २, ३ मध्ये देवगणांनी रुद्ररूपात परमात्म सत्तेचा केलेला साक्षात्कार, त्याचे वर्णन आणि स्तुती आहे. रूद्रास आदिकारणरूप, भूत, भविष्य, वर्तमान, पुरुष-अपुरुष-स्त्री, क्षर-अक्षर, गोप्य-गुह्य म्हणले गेले आहे. तोच चराचर जगतास आपल्या वैशिष्ट्यांनी विभूषित करणारा आहे. त्यालाच ओम तसेच अ, उ, म यांच्याही पलीकडचा म्हणले गेलेले आहे. कंडिका क्र. ४, ५ मध्ये त्याला प्रणवरूप म्हणून त्याची वैशिष्ट्ये, क्षमता आणि उपासना यांचे महत्त्व सांगितलेले आहे. सहाव्या कंडिकेत त्याच्यापासूनच सत, रज, तम इत्यादी गुणांची आणि मूळ क्रियाशील तत्त्वाची उत्पत्ती तसेच त्यापासून सृष्टीविकासाचे वर्णन केलेले आहे. सातव्या कंडिकेत उपनिषदाच्या अध्ययनाचे महत्त्व सांगितलेले आहे.

पहा :