Jump to content

अतुल सावे

अतुल मोरेश्वर सावे

विद्यमान
पदग्रहण
२०१४

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
पत्नी अंजली सावे
अपत्ये अजिंक्य सावे, अनुराग सावे
निवास औरंगाबाद
धर्म हिंदू
संकेतस्थळ www.atulsave.in

संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे म्हणजे अत्यंत प्रभावशाली, कर्तव्यदक्ष आणि सक्षम नेतृत्व. माजी खासदार श्री.मोरेश्वर सावे यांचे ते सुपुत्र असून तीर्थरूपांचा समाजकारण आणि विकासाचा लाभलेला वारसा ते अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत. त्यांच्या अद्वितीय कार्यामुळे 2014 ते 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात 2018 मध्ये त्यांना राज्यमंत्रिपद (उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ, महाराष्ट्र राज्य) तसेच हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. जनतेच्या कल्याणासाठी आपल्या पदाचा खंबीरपणे उपयोग करून घेत त्यांनी सुमारे २००० कोटींहून अधिक निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणला आणि म्हणूनच केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील एक खंबीर नेतृत्व म्हणून अतुल सावे पुढे येत आहेत.

राजकीय कारकीर्द

  • २०१४ – २०१९: आमदार, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ
  • २०१८ – २०१९: राज्यमंत्री, उद्योग आणि खनिकर्म, अल्पसंख्यांक विकास वक्फ महाराष्ट्र राज्य
  • २०१९ – वर्तमान: आमदार, औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ

गुणविशेष

एक रुबाबदार व्यक्तिमत्त्व, कायम प्रसन्न मुद्रा, भेदक नजर आणि विशाल कर्तुत्व. श्री.मोरेश्वर सावे यांच्या प्रामाणिक आणि आदर्शवत अशा चारित्र्यसंपन्न जीवनाचा वसा पुढे चालवणारे असे व्यक्तिमत्त्व. उद्योजक म्हणून यशस्वी होऊनही आणि परंपरेने प्राप्त सामाजिक जाणीव कायम ठेवून आपल्या सामाजिक जीवनात अनेक महत्त्वाचे प्रश्न हाती घेऊन, हिरीरीने कार्यात पुढाकार घेऊन अनेक वर्ष कार्य करत आहेत. नागरिकांचे प्रश्न आणि समस्यांकडे त्यांचे अत्यंत बारकाईने लक्ष असते आणि म्हणूनच प्रत्येकाच्या फोन कॉल्सला ते स्वतः उत्तर देतात. संबंधित प्रश्न समजून घेऊन नागरिकांशी संवाद साधणे आणि संवादासाठी फोन कॉलवरही उपलब्ध असणे ही त्यांची विशेषता आहे. प्रत्येक कार्याचा एक नियोजनबद्ध असा आराखडा तयार करून त्यासाठी योग्य व्यक्तींची नेमणूक करून स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक कार्य ते पूर्ण करतात. संभाजीनगरमध्ये लोकोपयोगी अनेक कार्ये त्यांनी केली आहेत आणि म्हणूनच जनमनामध्ये यांचे विशेष स्थान आहे. तीर्थरूप मोरेश्वर सावे यांचा लाभलेला समाजकारणाचा वारसा ते अत्यंत निष्ठेने सांभाळतात आपल्याला लाभलेल्या महनीय वारशाची जाणीव त्यांच्या कार्यातून दिसून येते. म्हणूनच आधी वीस पक्षासाठी वर्ष सातत्याने कार्य करून मग आमदारकीसाठी त्यांनी प्रयत्न केला. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः या ब्रीदवाक्याप्रमाणे त्यांचे कर्तृत्व दिसून येते. एक यशस्वी उद्योजक असूनही वडिलांना दिलेल्या शब्दासाठी आणि लोकहीताच्या तळमळीतून त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य अखंड आणि अविरत चालू आहे.

उद्योजकता, समाजकारण, राजकारण या विषयांचा खऱ्या अर्थाने माणुसकीसाठी, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणारे एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत.

सामाजिक योगदान

संभाजीनगरच्या सामाजिक विकास कार्यात अतुल सावे यांचे मोठे योगदान आहे. रस्ते, वीज, उद्योगधंदे, पर्यावरण, युवा सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, आरोग्य इत्यादी विकास कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजातील युवकांचे एकीकरण व्हावे या दृष्टिकोनातून दहीहंडीचा मोठा उत्सव दर वर्षी साजरा केला जातो. या निमित्ताने शहरातील हजारो युवक एकत्र येतात. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जातो. यामध्ये विविध देखावे, प्रबोधनाचे कार्यक्रम यामार्फत सामाजिक जागृतीचे कार्य ही मोठ्या प्रमाणात केले जाते. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण व्हावे, महिलांनी एकत्र यावे, महिला संघटन वाढावे या दृष्टिकोनातून अतुल सावे यांच्या सौभाग्यवती अंजली सावे यांच्यातर्फे हळदी-कुंकवाचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. शहरातील शेकडो माता-भगिनींना एकत्र जमवुन हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात दरवर्षी पार पडतो.

कचरा व्यवस्थापन

शहरवासीयांच्या पाठबळामुळे अनेक महत्त्वपूर्ण विषय अतुल सावे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ९० कोटी रुपयांना मंजूरी मिळवून शहराला कचरामुक्त केले तसेच अस्वच्छतेला दूर सारून विकासाकडे एक सक्षम पाऊल टाकण्यात त्यांचे आमूलाग्र योगदान आहे.

महाआरोग्य शिबीर

आरोग्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे व त्यासाठी आवश्यक सुविधा पुरवणे हे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. अनेकदा पैशाअभावी गरीब रुग्ण आपल्या आरोग्यावर साधा उपचार देखील करू शकत नाही. म्हणूनच अतुल सावे यांच्यातर्फे प्रतिवर्षी वाढदिवसानिमित्त समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी अतुल्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा एक नवीन उपक्रम असून २ वर्षापासून नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करत आहेत. प्रत्येक रुग्णाची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी तसेच मोफत औषधी व नेत्र रुग्णांसाठी मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे शकडो रुग्णांवर मोठ्या शास्त्रकियाही मोफत करण्यात आल्या आहेत. आजपर्यंत जवळपास २५००० पेक्षा अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.

सांडपाण्याचे व्यवस्थापन

नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या इतर विकास कामांप्रमाणेच स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी सांडपाण्याचा निचरा आणि त्याचे सुयोग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. कारण सांडपाण्याची व्यवस्था व विल्हेवाट योग्य प्रकारे लागली नाही तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणूनच यादृष्टीने खबरदारी म्हणून अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघात सांडपाण्याचे सुयोग्य नियोजन केले आहे. आमदार स्थानिक विकास निधी मधून भारतनगर, शिवाजीनगर येथे ४३ लाख रुपयांच्या ३००० मीटर लांबीच्या नवीन ड्रेनेज लाईन तसेच विनायक कॉलनी, जय भवानी नगर येथे नवीन ड्रेनेज लाईन बसविण्यात आल्या.

पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, येथील ड्रेनेजचे घाण पाणी हे पहाडे कॉर्नर येथे रोडवर साचते त्यामुळे शाळेत जाणारी लहान मुले, मंदिरात जाणारी वृद्ध नागरिक तसेच रोज कामासाठी जाणाऱ्या सर्व नागरिक व महिलांना त्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत असे. त्यासाठी संबंधित ठिकाणी ड्रेनेजची टिकाऊ आणि सुयोग्य व्यवस्था करण्यात आली.

विद्युत पुरवठा व वीज व्यवस्थापन

अनेक ठिकाणी जुन्या विद्युत वाहक तारांमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. म्हणूनच विद्युत वाहक तारा वेळोवेळी बदलणे त्याचप्रमाणे इतर आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असते. म्हणूनच शहरातील पुंडलिक नगर अंतर्गत न्यू हनुमान नगर गल्ली नंबर 3, गल्ली नंबर ४ येथे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न जुन्या विद्युत तारा बदलून नवीन AV केबल टाकून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्याच प्रमाणे इतर अनेक ठिकाणी विजेची कामे मोठ्या प्रमाणात विजेची सुविधा निर्माण करून देण्यात आली.

वृक्षारोपण

वाढत्या आधुनिकीकरणामुळे वने व जंगले संपुष्टात आली आहे. प्रदूषणामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी वेळीच खबरदारी म्हणून वृक्षारोपण हा एक सुयोग्य उपाय आहे. वन विभाग व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार तर्फे इकॉटास कोर्स बटालियनचा भव्य शुभारंभ करण्यात आला व याद्वारे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली गेली आहे.

क्रीडा

मोबाईल, इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या काळात मैदानी खेळ फारच कमी झाले आहेत. परंतु मुलांच्या शारीरिक वाढ व आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक असतात. त्यासाठी शहरात प्रोत्साहक अशा सोयीसुविधा निर्माण करण्याचा करण्याचा प्रयत्न केला.यात टेनिस ग्राउंड, अनेक ठिकणी ओपन जिम, उद्यानात खेळण्याचे साहित्य, क्रीडा संकुलांसाठी मोठे योगदान देण्यात आले.

संदर्भ