अतुल परचुरे (नोव्हेंबर ३०) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.
प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझं आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते.
कारकीर्द
चित्रपट
चित्रपट | भाषा | सहभाग |
---|
घरकुल | मराठी | अभिनय |
नाटक
नाटक | भाषा | सहभाग |
---|
कापूसकोंड्याची गोष्ट | मराठी | अभिनय |
गेला माधव कुणीकडे | मराठी | अभिनय |
तरुण तुर्क म्हातारे अर्क | मराठी | अभिनय |
तुझं आहे तुजपाशी | मराठी | अभिनय |
नातीगोती | मराठी | अभिनय |
व्यक्ती आणि वल्ली | मराठी | अभिनय |
टिळक आणि आगरकर | मराठी | अभिनय |
मालिका
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील अतुल परचुरे चे पान (इंग्लिश मजकूर)