Jump to content

अतुल कुलकर्णी

अतुल कुलकर्णी
जन्म सप्टेंबर १०, १९६३
बेळगाव, कर्नाटक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
भाषा मराठी, हिंदी, कन्नड, तामिळ, तेलुगु
प्रमुख नाटके गांधी विरुद्ध गांधी, झाले मोकळे आभाळ
प्रमुख चित्रपट देवराई, नटरंग, चांदनी बार, सत्ता, रंग दे बसंती
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार (२०००, २००२)
अधिकृत संकेतस्थळअतुलकुलकर्णी.कॉम

अतुल कुलकर्णी (सप्टेंबर १०, इ.स. १९६५ - ) हे मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेच्या निरुपणाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी लाभली.

सुरुवातीचे जीवन

बेळगावमध्ये जन्मलेल्या अतुलने दहावीपर्यंतचे शिक्षण हरिभाई देवकरण हायस्कूल, सोलापूरमध्ये पूर्ण केले. त्यांचे आईवडिल सोलापूरला स्थिरस्थावर झाले. १२वी बेळगावमध्ये पूर्ण करून तेथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पण आभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी.महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.

कलाजीवन

शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील "नाट्य आराधाना" नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली व त्याच्यातच कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९९२ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. १९९५ साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ईन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली

पुरस्कार व सन्मान

राष्ट्रीय पारितोषिके

२००२: चांदनी बार
२०००: हे राम

चित्रपट

मराठी चित्रपट

  • कैरी - २०००
  • ध्यासपर्व - २००१
  • १०वी फ - २००३
  • वास्तुपुरुष - २००३
  • देवराई - २००४
  • चकवा - २००५
  • मातीमाय - २००६
  • वळू - २००८
  • नटरंग - २०१०
  • प्रेमाची गोष्ट - २०१३
  • हॅपी जर्नी - (२०१४)

हिंदी चित्रपट

  • हे राम - २०००
  • चांदनी बार - २००१
  • रन - २००२
  • दम - २००२
  • सत्ता - २००३
  • ८८ ऍन्टॉप हिल - २००३
  • खाकी - २००४
  • पेज ३ - २००५
  • रंग दे बसंती - २००६
  • गौरी: द अनबॉर्न - २००७
  • देल्ही ६ - २००९

Junglee (2019)

  • सिटी ऑफ ड्रीम्स वेबसीरिज [अमेय राव गायकवाड,खासदार(चेंबूर लोकसभा मतदारसंघ)]

नाटके

बाह्य दुवे