Jump to content

अतिसूक्ष्म तुषारगृह

अतिसूक्ष्म तुषारगृह (MIST CHAMBER) :-

काही प्रकारच्या रोपांच्या नाजुक छाट्यांना रुजविण्याकरता छाट्यांवर पाने ठेवणे आवश्यक असते. छाटे रुजवताना ही पाने वाळू नयेत म्हणून भोवतालचे वातावरण कृत्रिम पद्धतीने आर्द्र व दमट ठेवतात.. पूर्वी झारीने वारंवार पाणी शिंपून आर्द्रता व दमटपणा ठेवीत असत. अलीकडे यांत्रिक पद्धतीने मधून मधून अतिसूक्ष्म तुषार सोडणाऱ्या पद्धतीचा (Intermittent mist) वापर करतात. त्यामुळे पानांसकट छाट्यांना रुजवणे सहज शक्य झाले आहे.