अताकामा रेडिओ दुर्बीण
अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे | |
संस्था | बहुराष्ट्रीय |
---|---|
स्थळ | यानो दे चाक्स्नांतोर वेधशाळा अताकामा वाळवंट, चिले |
निर्देशांक | 23°01′9.42″S 67°45′11.44″W / 23.0192833°S 67.7531778°W |
उंची | ५,०५८.७ मी (१६,५९७ फूट) |
दूरदर्शक श्रेणी | इंटरफेरॉमीटर (ऑप्टिकल फायबरने जोडलेले ६६ ॲंटेना) |
व्यास | १२ मी |
संकेतस्थळ | अधिकृत अल्मा संकेतस्थळ अधिकृत एन्आर्एओ अल्मा संकेतस्थळ अधिकृत ईएस्ओ अल्मा संकेतस्थळ अधिकृत एन्एओजे अल्मा संकेतस्थळ |
अताकामा लार्ज मिलिमीटर/सबमिलिमीटर ॲरे (अल्मा) हा एक रेडिओ इंटरफेरॉमीटर (रेडिओ दुर्बीण) आहे. चिले देशातील उत्तरेतील अताकामा वाळवंटात असलेल्या या प्रल्कपात १२ मीटर व्यासाच्या ६६ ॲंटेना अवकाशातून येणारे रेडिओ तरंग ग्रहण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. ही रेडिओ दुर्बीण ०.३ ते ९.६ मिमी तरंगलांबी वापरून अवकाशाचा शोध घेते. अल्माचा मुख्य हेतू विश्वाच्या आरंभकाळात झालेल्या ताऱ्यांच्या निर्मितीचा व सांप्रत विश्वातील ताऱ्यांचा आणि ग्रह निर्मितीचा अभ्यास करणे हा आहे.