अण्णामालै टेकड्या
अण्णामालै टेकड्या (अथवा 'अरुणाचल' - याचा उल्लेख "लाल पर्वत" असाही होतो) या तामिळनाडूत आहेत. यांना 'अरुणागिरी', 'अरुणाचलम', 'अरुणाई', 'सोनगिरी' अथवा 'सोनाचलम्' या नावांनीदेखील ओळखल्या जाते. दक्षिण भारतात शिवाच्या पाच पवित्र स्थानांपैकी ते एक स्थान आहे. या पर्वताच्या तळाशी शिवमंदिर आहे. दरवर्षी कार्तिगई या तमिळ महिन्यात (अंदाजे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये) कार्तिक दीपम् या टेकड्यांवर प्रज्वलित केल्या जातात.