Jump to content

अण्णा शिरगांवकर

अण्णा शिरगांवकर (१९३० - ) हे मराठी राजकारणी आहेत. ते कोकणातील दाभोळ शहरात राहतात. हे इतिहास संशोधक, पुराणवस्तू संग्राहक आणि लेखकही आहेत.

शिरगांवकरांना इसवी सनापूर्वीची नाणी, नऊ ताम्रपट, काही शिलालेख, ताडपत्रे, हस्तलिखिते, सनदा, फर्माने, खलिते, मूर्ती, फॉसिल्स, गुहा, लेणी, खापरे, भांडी अशा वस्तू मिळाल्या. अनेक संस्थांमधील विद्वानांनी त्यांवर संशोधन केले, शोध निबंध लिहिले. ह्या सर्वांतून कोकणच्या इतिहासावर नवा प्रकाश पडायला मदत झाली.[]

पुस्तके

  • ऐतिहासिक दाभोळ : वर्तमान व भविष्य
  • प्रकाशदीप (शिरगांवकरांच्या जीवनात आलेल्या अण्णासाहेब बेहेरे, गो.नी. दांडेकर, रामभाऊ म्हाळगी, मधु मंगेश कर्णिक इत्यादी व्यक्तीचे व्यक्तिचित्रण)
  • शेवचिवडा (विनोदी लेखसंग्रह)
  • शोध अपरान्ताचा Archived 2019-09-06 at the Wayback Machine. (अण्णा शिरगांवकरांची शोध मोहीम, इतिहासाबद्दलचे संदर्भ, त्यावरील त्यांचे विचार याचा घेतलेला मागोवा).

संदर्भ

  1. ^ दापोली, तालुका. "दापोलीचे इतिहासाचार्य – अण्णा शिरगावकर". Taluka Dapoli (इंग्रजी भाषेत). 2019-09-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-09-06 रोजी पाहिले.