अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन, कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन, राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन, राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, शाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन, किंवा साहित्यिक अण्णा भाऊ साहित्य संमेलन या नावांनी ही संमेलने भरतात. अनेक संस्था अण्णा भाऊंच्या नावाने साहित्य संमेलने भरवत असल्याने त्यांच्यांत नामैक्य नाही. अशा काही होऊन गेलेल्या अण्णा भाऊ साहित्य संमेलनांची ही जंत्री :-
- १ले कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे २००८मध्ये झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. हे साहित्य संमेलन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या प्रयत्नांतून झाले.
- पहिले राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.
- २रे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन अहमदनगर येथे २१-२२ मे २०१० या काळात झाले. संमेलनाध्यक्ष प्रा. राजन गवस होते.
- दुसरे राज्यस्तरीय अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नाशिक येथे २३-२४ जुलै २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
- ३रे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे.
- तिसरे राज्यव्यापी कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नांदेड येथे २०११ साली झाले. संमेलनाध्यक्ष दीनानाथ मनोहर होते.
- ४थे राज्यव्यापी कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नागपूर येथे २५-२६ ऑगस्ट २०१२ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष ॲडव्होकेट लेखक एकनाथ आव्हाड होते.
- ५वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते.
- ५वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन ४-५ जानेवारी २०१४ साली नाशिकमध्ये झाले. संमेलनाध्यक्ष रावसाहेब कसबे होते.
- ६वे अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन परभणी येथे २०१० साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.
- ६वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन सावंतवाडी येथे १७-१८ जानेवारी २०१५ या काळात झाले. संमेलनाध्यक्षपदी साहित्य अकादमी पुरस्कृत कवी सतीश काळसेकर होते.
- कोल्हापूर येथील श्रमिक प्रतिष्ठान पुरस्कृत आणि बार्शीतील प्रगतीशील लेखक संघ व आयटेक कामगार केंद्र आयोजित ७वे कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय संमेलन २५ व २६ डिसेंबर २०१५ रोजी बार्शीत झाले. संमेलनाच्या अध्यक्षपदी उत्तम कांबळे होते. ज्येष्ठ विचारवंत आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते उद्घाटन झाले..
- ९वे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते.
- कोल्हापूर येथे १०-११ ऑगस्ट २०१३ या दिवसांत एक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष गोविंद पानसरे होते.
- याशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने झाली होती.
- ८वे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, बेळगाव, १६-१७ डिसेंबर २०१७, अध्यक्ष - डॉ. माया पंडित
- १०वे काॅम्रेड अण्णा भाऊ साठे राज्यव्यापी साहित्य संमेलन धुळे येथे १३-१४ जुलै २०१९ या काळात झाले, अध्यक्ष - विद्यापीठ अनुदान मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात
- जालना येथे २००२ (??) साली झालेल्या १०व्या अण्णा भाऊ साठे राज्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. वासुदेव मुलाटे यांचेकडे होते.
पहा
अण्णा भाऊ साठे राज्यव्यापी साहित्य संमेलन[permanent dead link]
अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने अनेक साहित्यिक आणि अन्य पुरस्कार दिले जातात.
हे सुद्धा पहा
- मराठी साहित्य संमेलने