Jump to content

अणुस्कुरा घाट

कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा यांना जोडणारा अणुस्कुरा घाट निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. या घाटातून ब्रिटिश काळामध्ये राजापूर बाजारपेठेमधून घाटमाथ्यावर निर्यात होणारा माल नेला जात असे. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने या घाटाला विशेष महत्त्व आहे. घाटाच्या पायथ्याशी अर्जुना मध्यम प्रकल्प, जामदा प्रकल्प आदी प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत. प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांची पुर्नवसन वसाहतही या घाटाच्या पायथ्याशीच वसविण्यात आली आहे. सह्याद्रीच्या या पर्वतरांगांमध्ये अनेक दुर्मिळ वन्यजीव, प्राण्यांचे वास्तव्य असून त्यांचा या भागात मोठ्या प्रमाणात वावर असतो. यामध्ये बिबट्यासह सांबर, गवारेडा आदी प्राण्यांचा समावेश आहे.

असंख्य नागमोडी धोकादायक वळणे, उंच दगडी सुळके आणि भुसभुशीत माती यामुळे हा घाट सुरक्षित नाही. येथील रस्ते व इतर सुविधांकडे गेली अनेक वर्षे दुर्लक्ष होत आले आहे.[१]

संदर्भ

  1. ^ http://www.pudhari.com/news/kokan/57337.html