अणुभार
अणूभार म्हणजे अणूचा स्थिर स्थितीत असलेला भार. हा भार साधारणपणे "एकत्रित अणू भार एककामध्ये मोजला जातो. मूलद्रव्याचा अणूभार हा त्याच्या अणूतील, अणू गतीमध्ये नसताना मोजलेला, सर्व इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्यट्रॉन ह्यांचा एकूण भार असतो. अणूभार हा शब्द बऱ्याच वेळा "सरासरी अणूभार", "सापेक्ष अणूभार" व "अणूचे वजन" ह्या शब्दांना समानार्थी म्हणून वापरला जातो. पण ह्या शब्दांच्या व्याख्येंत सूक्ष्म फरक आहे.