Jump to content

अणुक्रमांक


रसायनशास्त्रभौतिकशास्त्रानुसार अणूच्या गाभ्यामधील (केंद्रामधील) प्रोटॉनांच्या एकूण संख्येला अणुक्रमांक (इंग्लिश: Atomic number, ॲटॉमिक नंबर) म्हणतात. तो Z या चिन्हाने दर्शवला जातो. आवर्त सारणीतील प्रत्येक मूलद्रव्याला एकमेवाद्वितीय अणुक्रमांक असतो. विद्युतभाररहित अणूमध्ये अणुक्रेंद्राबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्याही अणुक्रमांकाइतकी असते. एकाच मूलद्रव्याच्या ज्या अणूमध्ये अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असतात त्यांना समस्थानिक असे म्हणतात.

  • "हेन्री मोस्लीने लिहिलेला निबंध" (इंग्लिश भाषेत). 2010-01-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)