Jump to content

अणुऊर्जा क्षमतेनुसार देशांची यादी

अणुऊर्जा प्रकल्प सध्या ३२ देशांमध्ये कार्यरत आहेत.[] बहुतेक प्रकल्प युरोप, उत्तर अमेरिका, पूर्व आशिया आणि दक्षिण आशियामध्ये आहेत. अमेरिका अणुऊर्जेचा सर्वात मोठा उत्पादक आहे, तर फ्रान्सचा अणुऊर्जेचा वीज निर्मितीमध्ये सर्वाधिक वाटा आहे. उर्जा सुरक्षेवर आधारित विद्यमान धोरणामुळे, फ्रान्स अणुऊर्जेपासून सुमारे ७०% वीज प्राप्त करतो.[] नवीन अंमलात आणलेल्या धोरणानुसार, २०३५ पर्यंत देश आपली ५०% वीज आण्विक स्रोतापासून मिळवणार आहे. २०१० मध्ये, फुकुशिमा दैची आण्विक आपत्तीपूर्वी, असे नोंदवले गेले होते की दरवर्षी सरासरी सुमारे १० अणुभट्ट्या चालू होतील अशी अपेक्षा होती. जरी जागतिक आण्विक संघटनेच्या मते, २००७ आणि २००९ दरम्यान १७ नागरी अणुभट्ट्या चालू होण्याची योजना होती, तरी फक्त पाच प्रत्यक्षात सक्रिय झाल्या.[] २०१२ मध्ये जागतिक आण्विक वीज निर्मिती १९९९ नंतर सर्वात कमी पातळीवर होती.[][]

चीनकडे सर्वात वेगाने वाढणारा अणुऊर्जा कार्यक्रम आहे ज्यामध्ये १३ नवीन अणुभट्ट्या निर्माणाधीन आहेत,[] आणि भारत, रशिया आणि दक्षिण कोरियामध्ये बऱ्याच प्रमाणात नवीन अणुभट्ट्या बांधल्या जात आहेत. त्याच वेळी, किमान १००जुन्या आणि लहान अणुभट्ट्या "बहुधा पुढील १०-१५ वर्षांमध्ये बंद होतील".[] २०३० पर्यंत तीन ते चार अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची पाकिस्तानची योजना आहे.[]

काही देशांनी भूतकाळात अणुभट्ट्या चालवल्या पण सध्या त्यांच्याकडे अणुभट्ट्या कार्यरत नाहीत. त्यापैकी, इटलीने १९०० पर्यंत आपली सर्व अणु केंद्रे बंद केली आणि १९८७ च्या जनमतामुळे इटालियन लोकांनी मतदान केल्याप्रमाणे अणुऊर्जा प्रकल्प बंद झाले. कझाकस्तान आणि आर्मेनिया भविष्यात अणुऊर्जा पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहेत. बेलारूसचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प निर्माणाधीन आहे आणि २०२० च्या अखेरीस तो कार्यान्वित करण्याची योजना आहे. या प्रकल्पाला रशियाकडून वित्तपुरवठा केला जातो.[]

अनेक देश सध्या अणुऊर्जा प्रकल्प चालवत आहेत परंतु अणुऊर्जा टप्प्याटप्प्याने हद्दपार करण्याची योजना आखत आहेत. हे देश बेल्जियम, जर्मनी, स्पेन आणि स्वित्झर्लंड आहेत . स्वीडन आणि तैवान सारखे इतर देश देखील फेज-आउटचा विचार करत आहेत. ऑस्ट्रिया आणि फिलिपिन्सने त्यांच्या पहिल्या पूर्णपणे बांधली गेलेल्या अणु संयंत्रांचा वापर करण्यास सुरुवात केली नाही.

आर्थिक, राजकीय आणि तांत्रिक कारणांमुळे, क्यूबा, लिबिया, उत्तर कोरिया आणि पोलंडने त्यांच्या पहिल्या अणु प्रकल्पांचे बांधकाम कधीच पूर्ण केले नाही आणि ऑस्ट्रेलिया, अझरबैजान, जॉर्जिया, घाना, आयर्लंड, कुवैत, ओमान पेरू, सिंगापूर आणि व्हेनेझुएला कधीही त्यांचे नियोजित पहिले अणु प्रकल्प उभारले नाही.[][१०] २०२० पर्यंत पोलंड १.५ GWe साठी प्रगत नियोजन टप्प्यात आहे आणि २०४० पर्यंत ९ GWe पर्यंत पोहोचण्याची योजना आहे.[११]

२०२१ मध्ये इराकने घोषित केले की २०३० पर्यंत त्यांची ८ आण्विक अणुभट्ट्या बांधण्याची योजना आहे जे सध्या टंचाई ग्रस्त असलेल्या ग्रिडमध्ये २५% पर्यंत विद्युत उर्जा पुरवेल. बोलीसाठी रशियन, कोरियन, चीनी, अमेरिकन आणि फ्रेंच कंपन्यांना आमंत्रित त्यांनी केले आहे.[१२]

आढावा

राष्ट्रीय उर्जा उत्पादनाची टक्केवारी म्हणून अणुउर्जावर आधारित राष्ट्रे.
युरोपमधील अणुऊर्जा प्रकल्प

२०२० मध्ये, अणुऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्या ३२ देशांपैकी फक्त फ्रान्स, स्लोव्हाकिया आणि युक्रेन हे देशातील बहुतांश वीज पुरवठ्यासाठी अणुऊर्जा हे स्रोत म्हणून वापरतात. इतर देशांकडे लक्षणीय प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती क्षमता आहे.[] २०२०मध्ये ७,८९,९१९ GWh अणुऊर्जा असलेले युनायटेड स्टेट्स सर्वात मोठे अणुऊर्जा उत्पादक आहेत , त्यानंतर ३,४४,७४८ GWh असलेले चीन आहे.[] डिसेंबर २०२० पर्यंत, ३,९७,७७७ मेगावॅट क्षमतेच्या ४४८ अणुभट्ट्या कार्यरत आहेत आणि ५३,९०५ मेगावॅट क्षमतेच्या ५१ अणुभट्ट्या निर्माणाधीन आहेत. निर्माणाधीन अणुभट्ट्यांपैकी १२,५६५ मेगावॅट क्षमतेच्या १३ अणुभट्ट्या चीनमध्ये आणि ४,१९४ मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्ट्या भारतात आहेत .[१३]

२०२० मध्ये अणुऊर्जा क्षमतेनुसार देशांची यादी[]
देश अणुभट्ट्या क्षमता

निव्वळ-एकूण (MWe)
वीजनिर्मिती (GWh) एकूण वीज

वापराचा वाटा
नोंदी
कार्यरत U/C
आर्जेन्टिना आर्जेन्टिना१,६४१ १०,०१२ ७.५%
आर्मेनिया आर्मेनिया४१५ २,५५२ ३४.५%
बांगलादेश बांग्लादेशलागू नाही लागू नाही
बेलारूस बेलारुस १,११० ३३८ १.०%
बेल्जियम बेल्जियम५,९४२ ३२,७९३ ३९.१% Phase-out planned
ब्राझील ब्राझील१,८८४ १३,२४४ २.१%
बल्गेरिया बल्गेरिया२,००६ १५,९३८ ४०.८%
कॅनडा कॅनडा१९ १३,६२४ ९२,१६६ १४.६%
चीन चीन५० १३ ४७,५२८ ३४४,७४८ ४.९%
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक३,९३४ २८,३७२ ३७.३%
फिनलंड फिनलंड२,७९४ २२,३५४ ३३.९%
फ्रान्स फ्रान्स५८ ६३,१३० ३३८,६७१ ७०.६%
इजिप्त इजिप्त४८००
जर्मनी जर्मनी८,११३ ६०,९१८ ११.३% २०२२ Phase-out
हंगेरी हंगेरी१,९०२ १५,१७९ ४८.०%
भारत भारत२३ १० ७,४८० ४३,०२९ ३.१%
इराण इराण९१५ ५,७९२ १.७%
जपान जपान३३ ३१,६७९ ४३,०९९ ५.१% Many reactors currently stopped
दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया२४ २३,१५० १५२,५८३ २९.६%
मेक्सिको मेक्सिको१,५५२ १०,८६४ ४.९%
नेदरलँड्स नेदरलँड्स४८२ ३,८८६ ३.२%
पाकिस्तान पाकिस्तान१,३१८ ९,६३९ ७.१%
रोमेनिया रोमेनिया१,३०० १०,५७५ १९.९%
रशिया रशिया३९ २९,५०३ २०१,८२१ २०.६%
स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया१,८३७ १४,३५७ ५३.१%
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया६८८ ६,०४१ ३७.८%
दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका१,८६० ११,६१६ ५.९%
स्पेन स्पेन७,१२१ ५५,८२५ २२.२%
स्वीडन स्वीडन७,७६३ ४७,३६२ २९.८%
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड२,९६० २३,०४९ ३२.९% Gradual Phase-out planned
तैवान तैवान३,८४४ ३०,३४२ १२.७%
तुर्कस्तान तुर्कस्तानलागू नाही लागू नाही लागू नाही
युक्रेन युक्रेन१५ १३,१०७ ७१,५५० ५१.२%
संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती१,३४५ १,५६२ १.१%
युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम१५ ८,९२३ ४५,६६८ १४.५%
अमेरिका अमेरिकेची संयुक्त संस्थाने९६ ९८,१५२ ७८९,९१९ १९.७%
एकूण जागतिक ४४९ ५५ ३९७,७७७ २,५५३,२००

संदर्भ

 

  1. ^ a b c d "Nuclear Share of Electricity Generation in 2020". IAEA. 24 June 2021. 25 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Nuclear Power in France | French Nuclear Energy - World Nuclear Association". www.world-nuclear.org. 2021-01-08 रोजी पाहिले.
  3. ^ a b Michael Dittmar. Taking stock of nuclear renaissance that never was Sydney Morning Herald, 18 August 2010.
  4. ^ WNA (20 June 2013). "Nuclear power down in 2012". World Nuclear News.
  5. ^ "Nuclear Power Today | Nuclear Energy - World Nuclear Association". www.world-nuclear.org.
  6. ^ "China Nuclear Power | Chinese Nuclear Energy - World Nuclear Association". www.world-nuclear.org. 2012-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-10-07 रोजी पाहिले.
  7. ^ "Pakistan plans to build several new nuclear reactors - official". www.reuters.com. 31 October 2017. 24 December 2019 रोजी पाहिले.
  8. ^ World Nuclear Association. Nuclear Power in Belarus World Nuclear Association, May 2020.
  9. ^ Duroyan Fertl (5 June 2011). "Germany: Nuclear power to be phased out by 2022". Green Left.
  10. ^ James Kanter (25 May 2011). "Switzerland Decides on Nuclear Phase-Out". New York Times.
  11. ^ Wilczek, Maria (2020-06-16). "Construction of Poland's first nuclear power plant to begin in 2026". Notes From Poland (इंग्रजी भाषेत). 2020-06-18 रोजी पाहिले.
  12. ^ "Iraq hopes to build 8 nuclear power reactors by 2030". Brecorder (इंग्रजी भाषेत). 15 June 2021. 2021-06-18 रोजी पाहिले.
  13. ^ Nuclear Power Reactors in the World (PDF). Vienna: International Atomic Energy Agency. 2020. ISBN 978-92-0-114820-9.