Jump to content

अडुळसा

မုရားကြီး (my); અરડૂસી (gu); Justicia adhatoda (eu); Justicia adhatoda (ast); Justicia adhatoda (ru); Justicia adhatoda (bcl); Justicia adhatoda (de); Justicia adhatoda (ga); جاستیکا ادهاتدا (fa); Justicia adhatoda (bg); بیکڑ (pnb); وہیکڑ (ur); Justicia adhatoda (ia); Justicia adhatoda (sv); Justicia adhatoda (ie); Justicia adhatoda (uk); Justicia adhatoda (la); Justicia adhatoda (es); 鸭嘴花 (zh-cn); అడ్డసరం (te); Valkopantterinkita (fi); বগা বাহক (as); Justicia adhatoda (eo); יוסטיציה אדטודה (he); ஆடாதோடை (ta); Justicia adhatoda (it); বাসক (bn); Justicia adhatoda (fr); Adotada (ht); Vasika justiitsia (et); असुरो (ne); Justicia adhatoda (en); වං ඇපල (si); Justicia adhatoda (io); अडुळसा (mr); Xuân tiết (vi); Justicia adhatoda (pt); Justicia adhatoda (vo); Justicia adhatoda (ceb); Justicia adhatoda (ext); Justicia adhatoda (sq); Justicia adhatoda (oc); Justicia adhatoda (war); Justicia adhatoda (pt-br); Justicia adhatoda (ro); เสนียด (th); Justicia adhatoda (pl); ആടലോടകം (ml); Justicia adhatoda (nl); Justicia adhatoda (an); 鸭嘴花 (zh); ಆಡು ಸೋಗೆ (kn); Justicia adhatoda (ca); Justicia adhatoda (gl); جوز الكالابار (ar); 鸭嘴花 (zh-hans); वसाका (hi) အပင်မျိုးစိတ် (my); taxon (nl); вид растение (bg); specie vegetali (it); espécie de plantas (pt); מין של עץ נוי ירוק-עד (he); especie de planta (ast); вид растения (ru); औषधी वनस्पती (mr); Art der Gattung Justicia (de); kasvilaji (fi); species of plant (en); loài thực vật (vi); 爵床科黑爵床属植物 (zh); вид рослин (uk) 大驳骨 (zh); جوز الكلابار (ar)
अडुळसा 
औषधी वनस्पती
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
  Wikispecies
प्रकारटॅक्सॉन
वापर
  • वनौषधी
IUCN conservation status
Taxonomy
साम्राज्यPlantae
SubkingdomViridiplantae
InfrakingdomStreptophyta
SuperdivisionEmbryophyta
DivisionTracheophyta
SubdivisionSpermatophytes
OrderLamiales
FamilyAcanthaceae
SubfamilyAcanthoideae
TribeJusticieae
GenusJusticia
SpeciesJusticia adhatoda
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
अडुळसा

अडुळसा कुल Adhatoda zeylanica Medic असून शास्त्रीय नांव (Adhatoda vasaka Nees)असे आहे. अडुळसा ही अ‍ॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिकाआहे. भारत, श्रीलंका, म्यानमारमलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा सु. १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.पानांत वासिसाईन हे अल्कलोइद आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

सामान्य नावे : मराठी-अडुळसा, अडुसा, वासा वसाका,गुजराती.-अडसोगे, अडुसो, अर्डुसी, हिंदी.-अडाल्सो, अरूशो, वसाका, कानडी अडसला, अडुमुत्तडा, अडुसोगे, संस्कृत. सिंहिका, वसाका, अटरूष.

वर्णन  : १.२ ते २.८ मी.उंचीचे दाट झुडुप, फांद्या एकमेकांविरूद्ध, वर जाणाऱ्या. पाने: १२-२० X ४-६ सें.मी. दीर्घवर्तुळाकार, कुंतसम. वरील पाने गर्द हिरवी खाली पांडूर.

फुले : कक्षस्थ कणिशात, फांद्यांच्या टोकांवर, पुष्पकोश नलिकाकृती, पांढरा, गुलाबी रेषांसहीत,

फळ : बोंड गदाकृती, अणकुचीदार, गोलाकार, आयताकृती, नलिकाकृती. फुल वेळ : ऑगस्ट-नोव्हेंबर.

अधिवास : बहुतेक ठिकाणी उत्पादित, काही ठिकाणी पडीत जागेत वाढते.

स्थान : महाराष्ट्र राज्यभर कुंपणांमध्ये, दाख्खन व कोकणात विपुल.

प्रसार : भारत, श्रीलंका, मलाया, दक्षिण-पूर्व आशिया.

उपयुक्त भाग : मूळे, पाने, फळे व फुले.

वर्णन

अडुळसा याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.यात पांढराकाळा अशा दोनजाती आहेत.यास पांढरी फुले येतात. झाड सुमारे २.५ ते ३ मीटर उंच वाढते.

गुणविशेष

मूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे . झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे . कुष्ठरोग, रक्ताचा अशुद्धपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद) आहे . मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोपवांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी आहे ,आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्या व कावीळ कमी करण्यासाठी उपपयोगी (युनानी) आहे .अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.आयुर्वेदानुसार खोकला,काविळ,दमा,श्वास,कफ,क्षय,त्रिदोष,मुख,मुत्रघात,सुज इत्यादी रोगांवर उपयुक्त आहे.

उपयोग

मूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी आहे . पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गूणकारी आहे . वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानंची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माश्या , पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो.याचे फुलांची भाजीही करतात.

अडुळसाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते

  • संस्कृत-अटरुप
  • हिंदी-आरुखा,आडसा,वासक
  • बंगाली-
  • गुजराती-अडुरशी
  • कन्नड-आडसोने
  • मळ्यालम-
  • तामिळ- आडाडोई
  • तेलुगू-आढासारं,आंडापाकु
  • इंग्रजी-
  • लॅटीन- Justicia adhatoda, (Adhatoda Vasica)

हे सुद्धा पहा

संदर्भ

[][][][]

  1. ^ वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री
  2. ^ https://marathi.kaise-kare.com/adulsa-aushadhi-vanaspati-upyog/
  3. ^ http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-adulsa-cultivation-agrowon-maharashtra-1613
  4. ^ अडुळसा