Jump to content

अडाण धरण

अडाण धरण
अधिकृत नाव अडाण धरण
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
अडाण नदी
स्थान लाड कारंजे, वाशिम जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ७५५ मी (२,४७७ फूट)
उंची ३०.१३ मी (९८.९ फूट)
उद्‍घाटन दिनांक १९७७
जलाशयाची माहिती
क्षमता १,४२८ किमी (५.०४×१०१३ घन फूट)
भौगोलिक माहिती
निर्देशांक 20°25′17.55″N 77°33′47.07″E / 20.4215417°N 77.5630750°E / 20.4215417; 77.5630750गुणक: 20°25′17.55″N 77°33′47.07″E / 20.4215417°N 77.5630750°E / 20.4215417; 77.5630750
व्यवस्थापन महाराष्ट्र शासन, भारत.

अडाण धरण हे मातीच्या व दगडाच्या भरावाचे धरण आहे. ते महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड अडाण नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे.

या धरणाची उंची पायव्यापासून सुमारे ३०.१३ मी (९८.९ फूट) आहे. याची लांबी ७५५ मी (२,४७७ फूट) इतकी आहे. या धरणाचे साठवणक्षमता १,४२८ किमी (५.०४×१०१३ घन फूट) असून पूर्ण भरण क्षमता ७८,३२०.०० किमी (२.७६५८४५×१०१५ घन फूट) इतकी आहे.[]हे धरण गोदावरीच्या खोऱ्यात येते.

महाराष्ट्र शासनाचे मानकांनुसार हा एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे.यातील ६९.६६ मिक्युमी पाणी शेतीच्या सिंचनासाठी तर ११.१२९ मिक्युमी पाणी हे पिण्याच्या वापरासाठी आहे.यातील पाण्याचा मृत साठा ११.०७ इतका आहे तर, ७९८ चौ. किमी इतके याचे जलसंधारण क्षेत्रफळ आहे.[]

संदर्भ

  1. ^ "भारतातील मोठ्या धरणांचे विनिर्देशन" (PDF). 2011-07-21 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2017-02-25 रोजी पाहिले.
  2. ^ भारताची जलस्रोत माहिती प्रणाली -अडाण धरण (इंग्रजी मजकूर) Adan Dam D03189 Check |दुवा= value (सहाय्य). दि. २५/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)