अटूर गोपालकृष्णन
मौटात्तू "अटूर" गोपालकृष्णन उन्नीदन् (मल्याळम : അടൂര് ഗോപാലകൃഷ്ണന് )( जुलै ९, १९४१, त्रावणकोर, केरळ)हे मल्याळी दिग्दर्शक, कथालेखक, पटकथालेखक आणि चित्रपट निर्माते आहेत. ते राष्ट्रीय पारितोषिकाचे ९ वेळा विजेते ठरले असून भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वांत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना २००४ साली गौरवण्यात आले आहे. ते पुण्यातील प्रसिद्ध भारतीय फिल्म आणि टेलीव्हि़जन संस्थेचे पदवीधर आहेत.