Jump to content

अटलांटिक तटबंदी

अटलांटिक तटबंदी (पिवळ्या रंगात)

अटलांटिक तटबंदी तथा अटलांटिक भिंत ही नाझी जर्मनीने पश्चिम युरोप व स्कॅंडिनेव्हियाच्या किनाऱ्यावर बांधलेली तटबंदी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ही भिंत १९४२ आणि १९४४ दरम्यान बांधली गेली. दहा लाखांपेक्षा फ्रेंच आणि इतर असंख्य कामगारांकडून वेठबिगारी करवून घेउन बांधण्यात आलेल्या या तटबंदीचा उल्लेख नाझी जर्मनी आपल्या जाहीरातबाजीत आवर्जून करे व ही बलाढ्य असल्याचा दावा करीत असे. वस्तुतः ऑपरेशन ओव्हरलॉर्ड व दोस्तांच्या इतर आक्रमक चढायांदरम्यान ही तटबंदी काही तास किंवा दिवसांपेक्षा अधिक तग धरू शकली नाही.

युद्ध संपल्यावर या तटबंदीची रया गेली व हिचा मोठा भाग ठिकठिकाणी समुद्रात कोसळला आहे तर उर्वरित भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.