अटल बोगदा
Overview | |
---|---|
स्थान | हिमाचल प्रदेश, भारत |
भौगोलिक समन्वय प्रणाली | 32°23′54″N 77°08′51″E / 32.3982°N 77.1475°Eगुणक: 32°23′54″N 77°08′51″E / 32.3982°N 77.1475°E |
मार्ग | लेह-मनाली महामार्ग राष्ट्रीय महामार्ग ३ |
Operation | |
काम सुरू झाले | २८ जून २०१० |
ऑपरेटर | बॉर्डर रोड संघटना |
बोगद्यातील रहदारीचा प्रकार | मोटार वाहने |
Technical | |
लांबी | ८.९ किलोमीटर (५.५ मैल) |
लेनची संख्या | दोन (जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी एक) |
ऑपरेटिंगचा वेग | ८० किमी/ता (५० मैल/तास) |
रुंदी | १० मीटर (३३ फूट) |
अटल बोगदा, रोहतांग [१] (पूर्वीचे नाव: रोहतांग बोगदा) हा माजी भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेले, लेहवरील हिमालयातील पूर्व पीर पंजाल पर्वतरांगेत रोहतांग खिंडीत [२] बनवलेला एक बोगदा आहे. हा ८.९ किमी (५.५ मैल) लांबीचा बोगदा आहे. हा भारतातील सर्वात लांब असलेल्या बोगद्यांपैकी एक असेल. यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर ४६ किमी (२८.६ मैल) ने कमी होण्याची शक्यता आहे. [३][४] या बोगद्याची उंची ३,१०० मीटर (१०,१७१ फूट) आहे तर रोहतांग समुद्रसपाटीपासून ३,९७८ मीटर (१३,०५१ फूट) उंचीवर आहे.
लेह-मनाली महामार्ग लडाखकडे जाणाऱ्या दोन मार्गांपैकी एक आहे. रोहतांग खिंडीत हिवाळ्याच्या महिन्यांत जोरदार बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे वर्षातील फक्त चार महिनेच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला असतो. हिवाळ्या दरम्यान या बोगद्यामुळे हा महामार्ग आता खुला ठेवता येईल. लेहला जाणारा दुसरा मार्ग श्रीनगर-द्रस-कारगिल-लेह महामार्गावरील झोजी ला खिंडीतून जातो आणि वर्षातून चार महिने बर्फामुळे तो बंद असतो. झोजी ला पास अंतर्गत १४ किमी (८.७ मैल) लांबीच्या बोगद्याचे नियोजन करण्यात आले आहे. पश्चिमेकडील अक्साई चिन आणि सियाचीन ग्लेशियरला सामोरे जाणाऱ्या सैन्यला पुरवठा करण्यासाठी हे दोन मार्ग महत्त्वाचे आहेत.
अटल बोगदा तंतोतंत रोहतांग खिंडीत नाही तर तो खिंडीच्या थोडासा पश्चिमेला आहे. दक्षिण प्रवेशद्वार 32°21′51″N 77°07′59″E / 32.3642°N 77.1330°E वर बियास नदीच्या दुसऱ्या बाजूला धुंडीच्या उत्तरेस आहे. [५] बोगद्याच्या उत्तरेकडील तोंड विद्यमान लेह - मनाली महामार्गला मिळते. ते तेलिंग गावाच्या जवळ 32°26′20″N 77°09′51″E / 32.4388°N 77.1642°E आहे. पूर्वेकडे ग्राम्फुपासून १० किमी (६.२ मैल) जे विद्यमान महामार्गावरील रोहतांग खिंडी नंतरचे पहिले गाव आहे.
सोयी सुविधा
ह्या बोगद्यात प्रत्येक १५० मीटर वर टेलीफोन ची सोय आहे. प्रत्येक ६० मीटर (१९७ फूट) वर आग विझवण्यासाठी नळ बसवलेला आहे. प्रत्येक ५०० मीटर (१,६४० फूट) वर आपात कालीन निकास आहे. प्रत्येक किलोमीटरवर हवेच प्रदूषण मोजण्याची आणि नियंत्रण करण्याची सोय आहे. प्रत्येक २५० मीटर (८२० फूट) सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीवर पूर्णपणे लक्ष ठेवता येणार आहे. ह्या बोगद्यातून वाहनांचा वेग ८० किलोमीटर/ तास इतका नियंत्रित करण्यात आला आहे. दररोज जवळपास ३००० कार आणि १५०० ट्रक ह्यांची वाहतूक होणार आहे. जवळपास वर्षभर हा बोगदा बर्फाने झाकलेला असणार आहे. हिमस्खलन अथवा दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून ह्या बोगद्याच्या दोन्ही बाजूला सेन्सर बसवण्यात आले आहेत ज्याची यंत्रणा डी.आर.डी.ओ. ने विकसित केली आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे अटल बोगदा देशातील अभियांत्रिकीचा एक मैलाचा दगड ठरणार आहे. ह्याच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्वच अभियंते, कामगार, आणि ह्याचे स्वप्न बघून ते प्रत्यक्षात तयार करणाऱ्या सर्व यंत्रणा ह्यांना माझा सलाम. 'अटल बोगदा' देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या काळात भारतीय सेनेसाठी वरदान ठरणार आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b "Atal Tunnel renamed as 'Atal Tunnel, Rohtang'". Times of India. 13 August 2020. 13 August 2020 रोजी पाहिले.
- ^ Polgreen, Lydia (31 July 2010). "India Digs Under Top of the World to Match Rival". The New York Times. 12 January 2012 रोजी पाहिले.
- ^ "Importance of Rohtang Tunnel for Lahaul & Pangi resident". The News Himachal. 2012-07-29 रोजी पाहिले.
- ^ "Explained: What is the strategic importance of Atal Tunnel at Rohtang?". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-08-29. 2020-08-29 रोजी पाहिले.
- ^ "Rohtang Tunnel: Highest Motorable Road Tunnel In The World". Kullu Manali. 16 सप्टेंबर 2018. 26 फेब्रुवारी 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 सप्टेंबर 2020 रोजी पाहिले.