Jump to content

अझीम प्रेमजी

Azim Premji (es); અઝીમ પ્રેમજી (gu); Azim Premji (ast); Азим Премджи (ru); Azim Premji (de); Azim Premji (ga); Ազիմ Պրեմժի (hy); 阿齐姆·普雷姆吉 (zh); Azim Premji (da); عظیم پریم جی (pnb); アジム・プレムジ (ja); Azim Premji (sv); Azim Premji (uk); अजीम प्रेमजी (sa); अज़ीम प्रेमजी (hi); అజీమ్ ప్రేమ్‌జీ (te); 아짐 프렘지 (ko); Azim Premdži (cs); அசிம் பிரேம்ஜி (ta); Azim Premji (it); আজিম প্রেমজী (bn); Azim Premji (fr); Azim Premji (nb); अझीम हशिम प्रेमजी (gom); 阿齊姆·普雷姆吉 (zh-hant); 阿齐姆·普雷姆吉 (zh-cn); Azim Premji (pl); अझीम प्रेमजी (mr); عظیم پریم جی (ur); Azim Premji (pt); ଅଜିମ ପ୍ରେମଜୀ (or); အဇင်မ် ပရမ်ဂျီ (my); Azim Premji (sq); Azim Premji (ca); Azim Premji (sl); ਅਜ਼ੀਮ ਪ੍ਰੇਮਜੀ (pa); Azim Premji (pt-br); Azim Premji (id); อะซีม เพรมจี (th); Azim Premji (nn); അസിം പ്രേംജി (ml); Azim Premji (nl); عظيم بريمجى (arz); Azim Premji (ms); ಅಜಿಮ್ ಪ್ರೇಮ್‍ಜಿ (kn); عظیم پرمجی (fa); Azim Premji (en); عظيم بريمجي (ar); 阿齐姆·普雷姆吉 (zh-hans); Azim Premji (uz) imprenditore indiano (it); ভারতীয় বিশিষ্ট শিল্পপতি (bn); taikun perniagaan, pelabur dan dermawan India (ms); Indian business tycoon, investor, and philanthropist (en); Indischer Unternehmer und Milliardär (de); ଭାରତୀୟ ବ୍ୟବସାୟୀ (or); کارآفرین هندی (fa); 印度商人 (zh); indyjski przedsiębiorca (pl); Індійський діловий магнат, інвестор та меценат (uk); Indiaas ondernemer (nl); भारतीय कारोबारी टाइकून, निवेशक, और परोपकारी (hi); భారతీయ వ్యాపార దిగ్గజం, పెట్టుబడిదారుడు మరియు పరోపకారి (te); Fundador y dueño de wipro technologies (es); Indian business tycoon, investor, and philanthropist (en); شخصية هندية (ar); एक भारतीय उद्देजक (gom); இந்தியத் தொழிலதிபர், முதலீட்டாளர் (ta) Azim Premji Hasham (ast); Премжи, Азим, Азим Премжи (ru); अझिम प्रेमजी (mr); ଅଜିମ୍ ପ୍ରେମଜୀ (or); Azim Premji Hasham (sq); 阿齊姆·普雷姆吉, 阿齊姆·普萊姆基 (zh); Azim Hashim Premji (sv); Azim Hashim Premji (ms); Azim Premji (ml); Azim Premji Hasham (nl); अजीमप्रेमजी (sa); ప్రేమ్జీ (te); ಅಜೀಂ ಹಶಾಮ್ ಪ್ರೇಮ್‌ಜಿ (kn); Azim Hashim Premji (uk); Azim Hashim Premji, Azim H. Premji, Azim Premji Hasham, Azim Hasham (en); Azim Hashim Premji (id); अझीम हशिम (gom); அஸிம் பிரேம்ஜிI, அசிம் பிரேம்சி, அசிம் பிரேம்ஞ்சி (ta)
अझीम प्रेमजी 
Indian business tycoon, investor, and philanthropist
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावअझीम हाशिम प्रेमजी
जन्म तारीखजुलै २४, इ.स. १९४५
मुंबई
नागरिकत्व
निवासस्थान
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अपत्य
  • रिषाद प्रेमजी
  • तारिक प्रेमजी
पुरस्कार
  • पद्मभूषण पुरस्कार (इ.स. २००५)
  • फॅराडे मेडल (इ.स. २००५)
  • पद्मविभूषण पुरस्कार व्यापार आणि उद्योग (इ.स. २०११)
  • इकॉनॉमिक टाइम्स पुरस्कार (इ.स. २०१३)
  • नाईट ऑफ द लेजन ऑफ ऑनर (इ.स. २०१८)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

अझीम हाशिम प्रेमजी (२४ जुलै १९४५) हे भारतीय व्यापारी, गुंतवणूकदार, अभियंता आणि परोपकारी आहेत, ते विप्रो लिमिटेडचे ​​अध्यक्ष होते. प्रेमजी बोर्डाचे गैर-कार्यकारी सदस्य आणि संस्थापक अध्यक्ष आहेत. ते अनौपचारिकपणे भारतीय आयटी उद्योगाचे झार म्हणून ओळखले जातात. सॉफ्टवेर उद्योगातील जागतिक नेत्यांपैकी एक म्हणून उदयास येण्यासाठी चार दशकांच्या विविधीकरण आणि वाढीद्वारे विप्रोला मार्गदर्शन करण्यासाठी ते जबाबदार होते. २०१० मध्ये, ते एशियावीक द्वारे जगातील २० सर्वात शक्तिशाली पुरुषांमध्ये निवडले गेले. टाइम नियतकालिकाने १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांची दोनदा यादी केली आहे, एकदा २००४ मध्ये आणि अगदी अलीकडे २०११ मध्ये. अनेक वर्षांपासून, ते नियमितपणे ५०० सर्वात प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत आहे. ते अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळुरूचे कुलपती म्हणूनही काम करतात.

अझीम प्रेमजी यांचा मुंबई मधील भारतीय मुस्लिम कुटुंबामध्ये जन्म झाला. त्यांचे वडील हे एक नावाजलेले  उद्योगपती होते व राईस किंग ऑफ बर्मा म्हणून ओळखले जात. पाकिस्तानचे संस्थापक मुहंमद आली जिन्हा यांनी अझीम प्रेमजी यांचे वडील मुहंमद हाशिम प्रेमजी यांना पाकिस्तानमध्ये आमंत्रित केले होते, परंतु त्यांनी ती विनंती फेटाळली व भारतातच राहणे पसंत केले. अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफर्ड विध्यापिठामधून इलेकट्रीकल इंजिनीयरींग या विषयामधून पदवी घेतली आहे. त्यांनी यास्मिन यांच्याशी विवाह केला. अझीम प्रेमजी याना रिषद आणि तारिक ही दोन मुले आहेत. रिषद हे सध्या विप्रो कंपनीच्या आयटी विभागात चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर म्हणून काम पाहत आहेत. ऑक्टोबर २०१९ च्या यादी नुसार ते भारतातील दहा अतिश्रीमंत  लोकांमध्ये येतात. २०१३ मध्ये त्यांनी द गिविंग प्लेज साइन करून त्याची अर्धी संपत्ती दान करण्याचे ठरवले आहे. अझीम प्रेमजी यांनी 'अझीम प्रेमजी फौंडेशन, स्थापना केली आहे जी भारतातील शिक्षण क्षेत्रासाठी काम करते.

अझीम प्रेमजी

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी मुहंमद हाशिम प्रेमजी यांनी १९४५ साली वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लि. सुरू केली. या कंपनी मध्ये सनफ्लॉवर वनस्पती या नावाखाली कुकिंग ऑइलचे उत्पादन घेतले जात, त्याचबरोबर ७८७ नावाने लौंड्री सोपची ही निर्मिती केली जात असे.  १९६६ साली वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अझीम प्रेमजी स्टॅनफर्ड विध्यापिठामधून भारतात परतले व त्यांनी विप्रो कंपनीचा चार्ज घेतला, यावेळी ते २१ वर्षांचे होते. त्या काळी वेस्टर्न इंडियन वेजिटेबल प्रोडक्ट्स लि या नावाने ओळखली जाणारी कंपनी हैड्रोजनीत वनस्पती तेलाची निर्मिती करत होती , परंतु अझीम प्रेमजी यांनी बेकरी फॅट्स, हेअर केर सोप्स, बेबी टोयलीटरीज, लायटिंग प्रोडक्ट्स,ची उत्पादने घेण्यास सुरुवात केली. १९८० च्या दशकात माहिती तंत्रज्ञानाची महत्त्व ओळखून या तरुण उद्योगपतीने उच्च तंत्रज्ञानाच्या निर्मितीस सुरुवात केली. सेंटीने या अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने त्यांनी मिनी कम्प्युटर्सचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी आपल्या कंपनीचे 'विप्रो' असे नामकरण केले. त्यांनी आपले सगळे लक्ष माहिती तंत्रज्ञाना कडे वळवले.

२००५ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. तसेच २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एडुकेशन ने २००० साली मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले. २००६ साली नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनीयरिंग, मुंबई यांनी अझीम प्रेमजी यांना लक्ष्य बिझनेस व्हिजनरी या पुरस्काराने सन्मानित केले.बिझनेस वीक मॅगझीन ने विप्रो कंपनी ही जगातील सर्वात वेगवान प्रगती करणारी कंपनी  व अझीम प्रेमजी यांची महान उद्योगपती म्हणून दाखल घेतली.  २००९  साली मिडलटाऊन येथील  वेसलेयन विद्यापीठ ने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन  मानद विद्यावाचस्पती पदवीने सन्मानित केले.  २०१५ साली म्हैसूर विज्ञापीठाने मानद विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केले. एप्रिल २०१७ साली इंडिया टुडे मॅगझिनने २०१७ सालच्या यादीमध्ये भारतातील ५० प्रभावशाली लोकांमध्ये अझीम प्रेमजी यांना ९ वा क्रमांक दिला.

सामाजिक कार्य‌

२००१ साली अझीम प्रेमजी फौंडेशन या संस्थेची स्थापना केली. डिसेंबर २०१० साली भारतातील शालेय शिक्षणा साठी २ अब्ज यू एस डॉलर दान करण्याची प्रतिज्ञा केली.

स्थापित कंपन्या

  • विप्रो लायटिंग व विप्रो जीई मेडिकल सिस्टिम्स, १९९१
  • विप्रो नेट, १९९९
  • नेटक्रेकर, २०००
  • विप्रो वॉटर, २००८
  • विप्रो इकोएनर्जी, २००९

संदर्भ