Jump to content

अझरबैजानचा लष्करी इतिहास

अझरबैजानच्या लष्करी इतिहासात आधुनिक अझरबैजानचा समावेश असलेल्या प्रदेशातील हजारो वर्षांच्या सशस्त्र कारवाया तसेच परदेशातील संघर्षांमध्ये अझरबैजान सशस्त्र दलांनी केलेल्या हस्तक्षेपांचा समावेश आहे. अझरबैजानी लोक विविध प्राचीन सभ्यता आणि लोकांचे वारसदार आहेत असे मानले जाते ज्यात स्थानिक कॉकेशियन, अल्बेनियन, इराणी जमाती जसे की सिथियन आणि ॲलान्स आणि ओघुझ तुर्क यांचा समावेश आहे‌.

युरोप आणि आशियाच्या तिठ्यावरील स्थानामुळे अझरबैजानला युरोपीय आणि पौर्वात्य लष्करी शक्तींशी लष्करी संपर्क साधणे शक्य झाले.