Jump to content

अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
Азербайджанская Советская Социалистическая Республика
Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы

{{{सुरुवात_वर्ष}}}१९९१
ध्वजचिन्ह
राजधानीबाकू
अधिकृत भाषाअझरबैजानी, रशियन
क्षेत्रफळ८६,६०० चौरस किमी
लोकसंख्या७०,३७,९००
–घनता८१.३ प्रती चौरस किमी

अझरबैजान सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Азербайджанская Советская Социалистическая Республика; अझरबैजानी: Азәрбајҹан Совет Сосиалист Республикасы) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते. पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस रशियन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १९१८ साली अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक नावाचे राष्ट्र स्थापन केले गेले. परंतु केवळ दोन वर्षातच रशियन बोल्शेविकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अझरबैजानने शरणागती पत्कारली व अझरबैजानला सोव्हिएत संघामध्ये विलिन करण्यात आले.

२५ डिसेंबर १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत अझरबैजानचे अझरबैजान देशामध्ये रूपांतर झाले.