अझर माजेदी
अझर माजेदी (फारसी: آذر ماجدی) ही एक इराणी साम्यवादी कार्यकर्ता, लेखिका, महिला स्वातंत्र्य संघटनाची अध्यक्ष आणि वर्कर-कम्युनिस्ट पार्टी ऑफ इराण ची एक नेता आहे. इराणच्या चालू सरकारची ती विरोधक आहे. १९७८ मध्ये ही परदेशातून शिक्षण घेऊन परतली व चळवळ सुरू केली.[१]
माजेदी चा जन्म इराणमध्ये एका नास्तिक वडिलांच्या व मुस्लिम आईच्या घरी झाला.[२]
वैयक्तिक जीवन
माजेदीचा विवाह साम्यवादी कार्यकर्ता मन्सूर हेकमत ह्यांच्या सोबत झाला. तिला त्याच्यासोबत तीन मुले आहेत.[३] तिने फ्रेंच साहित्य व भूगोल आणि आंतरराष्ट्रीय विकास या दोन विषयांमध्ये पदवी मिळवली आहे . ती स्वीडन मधल्या राओल वालेनबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन लॉ अँड ह्युमॅनिटॅरिॲनिझम येथे २००८ साली आमंत्रित शिक्षिका होती.
इराणच्या इस्लामी क्रांती मध्ये ती सक्रीय होती व तेथे महिलांच्या अनेक आंदोलनांमध्ये व चळवळी मध्ये तिने भाग घेतला.[४]
राजनीतिक संकल्पना
माजेदी स्वतःचे मार्क्सवादी व कामगार-साम्यवादी असे वर्णन करते.[५] ती वयाच्या १२व्या वर्षी नास्तिक झाली.[६]
तिने इस्लामला 'एक गर्भसंगीत विचारधारा' असे म्हणले आहे.[२] तिने २००१ मधल्या एका मुलाखतीत म्हणले की समाजाने इस्लामचे निर्मुलन करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.[७] दुसऱ्या एका मुलाखतीत माजेदीने 'इस्लाम भय' हे अस्तित्वात नसून, ते इस्लाम व त्याच्यातील चळवळ शांत करण्यासाठी पसरवण्यात आले.[८]
२०१२ मध्ये आलिया मगदा एलमहडी हिने इस्लाममध्ये होणाऱ्या महिलांवारच्या अत्याचार विरुद्ध युटूब वर नग्न चलचित्र टाकले. ह्यावर बोलतांना माजेदी बोलली की नाग्न्तेचा वापर इतर प्रसार माध्यमांप्रमाणे युटूबवरही नफा कमावण्यासाठी करण्यात येत आहे व युरोपात आवाज उठवणे हे इजिप्त व इतर मध्य पूर्व आशियाई देशांपेक्षा वेगळे आहे.[९]
फ्रान्समध्ये धार्मिक चिन्हे इत्यादी वर शाळा वर कामाच्या जागी बंदीवर माजेदी बोलते की हा धार्मिक स्वतान्र्याचा नकारा नसून, धर्माचा नागरी जीवनावर होणारा परिणाम व राजकीय कार्भारांमध्ये धर्मामुळे होणारे हस्तक्षेप, ह्यासाठी असल्या बंदी आवश्यक आहे. धर्मावरच्या बंदी ह्या समाजाला जास्त एक्तेकडे नेतील व मुख्यता महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध काम करतील असे माजेदीने म्हणले.[१०]
मन्सूर हेकमत फाऊनडेशन
तिच्या पतीच्या देहांतानंतर तिने मन्सूर हेकमत फाऊनडेशन ही संस्था सुरू केली. त्यामध्ये मान्सूरने आजारी असतांना तिला निवेदन केल्या प्रमाणे त्याचे प्रकाशित व अप्रकाशित राजकीय व अराजकीय लेख प्रसारित करण्याचे काम ही संस्था करते.[११]
संदर्भ
- ^ "Popular Movement to Overthrow Islamic Regime of Iran, a Just Movement". 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-26 रोजी पाहिले.
- ^ a b "Frontpage interview Azar Majedi". 2017-12-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-26 रोजी पाहिले.
- ^ [१] Mansoor Hekmat
- ^ [२] Archived 2021-09-27 at the Wayback Machine. Planery Session : Social and cultural Impact of Iranian revolution
- ^ [३] Nudity or Nudity : Azar Majedi
- ^ [४] Political islam a thread to humankind
- ^ [५] On the fight against religion
- ^ [६] Archived 2017-06-26 at the Wayback Machine. Does Islamophobia exist in England?
- ^ [७] Iranian women strip to slam repression
- ^ [८] : Secular Islam
- ^ [९] Mansoor Hekmat Foundation