Jump to content

अजेय झणकर

अजेय झणकर (१ सप्टेंबर, १९५९ - २ एप्रिल, २०१७) हे मराठी लेखक, पटकथा लेखक, गीतकार, दिग्दर्शक व चित्रपटनिर्माता होते.

झणकर यांचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. तेथे त्यांना पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत लेखकाचा पुरस्कार मिळाला.

झणकर यांनी 'मार्केट मिशनरीज' नावाची संस्था जाहिरातसंस्था सुरू केली.

झणकरांनी महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीसाठी अनेक वर्षे काम केले.

सरकारनामा आणि द्रोहपर्व या झणकर यांच्या दोन गाजलेल्या कादंबऱ्या होत. यापैकी ‘सरकारनामा’ कादंबरीवर याच नावाचा चित्रपट झणकर यांनी १९९८ साली बनवला. ह्या चित्रपटाला बरेच पुरस्कार तसेच प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद लाभला. त्यानंतर झणकर यांनी ‘लेकरू’ ह्या चित्रपटाची कथा लिहिली आणि त्यावरील चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रावणी देवधर यांनी केलं होतं. ‘द्रोहपर्व’वर झणकर यांनी ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवुड चित्रपट बनवला. मराठी कादंबरीवर हाॅलिवुडचा चित्रपट बनणे हे पहिल्यांदाच घडले. 'पेशवे सैन्याशी झालेल्या वडगावच्या लढाईत जर इंग्रज जिंकले असते तर १७७९ सालीच हिंदुस्थान पारतंत्र्यात गेला असता' हा 'द्रोहपर्व' कादंबरीचा मध्यवर्ती विषय होता.

'सरकारनामा'मधील गाजलेल्या 'अलवार तुझी चाहूल' या गाण्याचे संगीतदिग्दर्शन झणकर यांचे होते.

'बटरफ्लाईज ऑफ बिल बेकर' या इंग्रजी चित्रपटाची कथा झणकरांची होती.