अजिता श्रीवास्तव
अजिता श्रीवास्तव | |
---|---|
जन्म | वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत |
प्रसिद्ध कामे | कजरी लोकगीते |
पुरस्कार | पद्मश्री (२०२२) उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१७) |
अजिता श्रीवास्तव या एक भारतीय गायिका, शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. मिर्झापूर आणि आजूबाजूच्या प्रदेशातील लोकसंगीताचा लोकप्रिय प्रकार, कजारी लोकगीते लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी अजिता श्रीवास्तव यांना ओळखले जातात.[१] कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.[२]
जीवन आणि शिक्षण
अजिता श्रीवास्तव यांचा जन्म वाराणसी, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांनी प्रयागराज येथील प्रयाग संगीत समितीमधून संगीत प्रभाकर गोरखपूर विद्यापीठातून येथून बी.एड. आणि बनारस हिंदू विद्यापीठातून एम.ए. शिक्षण पूर्ण केले.[३]
पुढे अजिता श्रीवास्तव यांनी मिर्झापूर येथील रासबिहारी लाल यांच्याशी विवाह केला. ते व्यवसायाने प्रसिद्ध कवी, लेखक आणि वकील होते. लग्नानंतर त्या तिथेच स्थायिक झाल्या. त्यांचा एकुलता एक मुलगा अनुराग आनंद भारतीय वायुसेनेत कार्यरत आहे.[४]
कारकिर्द
अजिता श्रीवास्तव यांनी १९८० मध्ये ऑल इंडिया रेडिओ वाराणसीमधून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली. ऑल इंडिया रेडिओ, लखनौ दूरदर्शन, संगीत नाटक अकादमी उत्तर प्रदेश, इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, परराष्ट्र मंत्रालय, एनसीझेडसीसी प्रयागराज, पर्यटन मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, दिल्ली सरकार, यासह ती विविध संस्थांशी निगडीत आहेत आणि काम करत आहेत. भारतीय सेना आणि टी-सीरीज बरोबर देखील त्या काम करतात.[३]
२०१७ मध्ये, त्या ४० वर्षांच्या अध्यापन कारकीर्दीनंतर आर्य कन्या इंटर कॉलेजमधून लेक्चरर म्हणून निवृत्त झाल्या. [५] तेव्हापासून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कजारी आणि इतर लोकसंगीताचे जतन, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपला वेळ पूर्णपणे समर्पित केला आहे.[६]
पुरस्कार
- २०२२ - पद्मश्री [२]
- २०२१ - विश्व हिंदी शोध संवर्धन पुरस्कार
- २०२१ - काजली कोकिला पुरस्कार
- २०२१ - योग शिक्षा इवम काजली गायिका पुरस्कार
- २०२१, २०१० - सार्क फोसवाल पुरस्कार
- २०२१, २०२०, २०१९ – उत्तर प्रदेश सरकारकडून नारी शक्ती पुरस्कार
- २०२० - काशी आनंद सन्मान
- २०१९ – हरित उत्तर प्रदेश, स्वच्छ उत्तर प्रदेश भेट सन्मान
- २०१९ - काजली कार्यशाला मुख्य प्रशिक्षिका पुरस्कार
- २०१७ – नमामि जागृती सन्मान
- २०१७ – उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार [१]
- २०११ – वैश्य गौरव सन्मान
- २००८ – अमर उजाला तर्फे नारी शक्ती सन्मान
- १९९६ - काजली साम्राज्ञी पुरस्कार
संदर्भ
- ^ a b "मीरजापुर की कजरी गायिका अजिता श्रीवास्तव को पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार से भी हो चुकी हैं सम्मानित". Zee News (हिंदी भाषेत). 2022-03-22 रोजी पाहिले."मीरजापुर की कजरी गायिका अजिता श्रीवास्तव को पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार से भी हो चुकी हैं सम्मानित". Zee News (in Hindi). Retrieved 2022-03-22.
- ^ a b "Padma Awardees 2022" (PDF). Padma Awards."Padma Awardees 2022" (PDF). Padma Awards.
- ^ a b "पद्म पुरस्कार 2022 : मीरजापुर की कजरी गायिका अजीता श्रीवास्तव को पद्मश्री, 42 वर्षों की निरंतर साधना व तप के बाद मिली सफलता". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-03-22 रोजी पाहिले."पद्म पुरस्कार 2022 : मीरजापुर की कजरी गायिका अजीता श्रीवास्तव को पद्मश्री, 42 वर्षों की निरंतर साधना व तप के बाद मिली सफलता". Dainik Jagran (in Hindi). Retrieved 2022-03-22.
- ^ "वाराणसी के 6 लोगों को मिला पदम पुरस्कार, मिर्ज़ापुर की अजीता श्रीवास्तव भी शामिल, जानिए इनके जीवन की कहानी". mirzapurofficial.in (हिंदी भाषेत). 2022-01-27. 2022-03-22 रोजी पाहिले.
- ^ "कजरी गायिका अजिता श्रीवास्तव को मिला पद्मश्री अवॉर्ड, 36 वर्षों से गायन के क्षेत्र में कर रही हैं काम". ETV Bharat News. 2022-03-22 रोजी पाहिले.
- ^ Ganga, A. B. P. (2022-01-26). "मिर्जापुर की प्रसिद्ध कजली गायिका अजीता श्रीवास्तव को मिला पद्म श्री अवार्ड, ऐसा रहा करियर". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2022-03-22 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- यूट्यूबवर डीडी उत्तर प्रदेशची सावन आणि कजरी मुलाखत (हिंदीमध्ये)