Jump to content

अजित वाच्छानी

अजित वाच्छानी (१९५१ - २५ ऑगस्ट २००३) हे एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन वरील चरित्र अभिनेते होते. मिस्टर इंडिया (1987) ("तेजा" म्हणून), मैने प्यार किया (1989), कभी हा कभी ना (1993), हम आपके है कौन, (1994) तसेच हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले होते. (1994) आणि हम साथ साथ हैं (1999) यासह अनेक हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. 'हम आपके है कौन' आणि 'हम साथ साथ हैं' हे त्याचे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आणि कमाई करणारे चित्रपट आहेत. त्यांनी ५० हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट 'एक पेक्षा एक' याशिवाय तीन सिंधी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी 'हसरते', 'दाने अनार के' आणि 'एक महाल हो सपनो का' आदी हिंदी दूरचित्रवाणी मालिकांत देखील काम केले होते.[][]

वैयक्तिक जीवन

राकेश चौधरी निर्मित संवाद व्हिडिओच्या 'बनते बिगडते' (१९८५) मधून अजितने आपल्या दूरचित्रवाणी वरील अभिनयाच्या कारकीर्दीस सुरुवात केली आणि लवकरच ते टेलिव्हिजनवर एक लोकप्रिय अभिनेते बनले. त्यानंतर लवकरच त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. वाच्छानी यांनी ५० हून अधिक हिंदी चित्रपट, एक मराठी चित्रपट आणि तीन सिंधी चित्रपटांमध्ये काम केले. तसेच ते गुजराती आणि मराठी नाटकांमध्ये ते नियमित काम करत होते.

२५ ऑगस्ट २००३ रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे मुंबईत निधन झाले आणि त्यांच्या पश्चात पत्नी मराठी अभिनेत्री चारुशीला साबळे आणि दोन मुली असा परिवार आहे.[]

अभिनयाची सूची

चित्रपट

वर्षचित्रपटभूमिकानोंद
२००३राजा भैयाप्रेम साहनी
२००२आँखें
२००१जोडी नंबर वन
२०००हर दिल जो प्यार करेगा
१९९९हु तू तू
१९९९बीवी नं॰ १
१९९९सिर्फ तुम
१९९९हम साथ साथ हैंमामाजी (वकील)
१९९८फूल बने पत्थर
१९९८धूँढते रह जाओगे
१९९७आर या पार
१९९७नसीबदीनदयाल
१९९७उफ़ ! ये मोहब्बत
१९९७मृत्युदंड
१९९६दुनिया झुकती है
१९९५अहंकार
१९९५टक्कर
१९९४हम आपके हैं कौनमामाजी (प्रोफेसर)
१९९४बेटा हो तो ऐसाइंस्पेक्टर राम सिंह
१९९४इंसानियत
१९९४छोटी बहूआदर्श
१९९३गीतांजली
१९९३लुटेरे
१९९३कन्या दानअमृत सिन्हा
१९९३रूप की रानी चोरों का राजा
१९९३दिल की बाज़ीवकील वाच्छानी
१९९२इंसानियत के देवतारंजीत
१९९२सूर्यवंशी
१९९२अनामइंस्पेक्टर के.के दीवान
१९९२राजू बन गया जेंटलमनमल्होत्रा
१९९२दीदारमेजर विवेक शर्मा
१९९२महबूब मेरे महबूब
१९९१भाभी
१९९११०० डेज
१९९०तुम मेरे हो
१९९०लेकिन
१९९०पुलिस पब्लिक
१९९०अव्वल नम्बरपुलिस इंस्पेक्टर
१९८९मैंने प्यार कियाविक्रम
१९८९शिवा
१९८९मैं आज़ाद हूँ
१९८७ये वो मंज़िल तो नहींपुलिस सुपरिटेन्डेन्ट
१९८७मिस्टर इण्डियातेजा
१९८५खामोश

दूरचित्रवाणी

वर्षमालिकाभूमिकाचॅनल
१९८७चुनौतीडीडी नॅशनल
१९८७मुजरिम हाजीर
१९८७मिट्टी के रंग
१९९४दाणे अनार के
१९९४जुनूनकेकेचे वडील
१९९६आम्ही हिंदुस्थानीअडवाणी साहेब
१९९०हसरतेंगोविंद सहायझी टीव्ही
१९९७जंजिरें
१९९८गुदगुदीमोहन शुक्ला
१९९९एक महल हो सपना कापुरुषोत्तम नानावटीसोनी टीव्ही
२०००बाबुल की दुवाए लेती जागोविंदझी टिव्ही

संदर्भ

  1. ^ "Actor dies". The Telegraph. 26 August 2003.
  2. ^ "I will be your father figure". Indian Express. 1 December 1998.
  3. ^ "Actor Ajit Vachhani dead". Rediff Movies. 25 August 2003.