अजित (अभिनेता)
अजित (अभिनेता) | |
---|---|
अजित (अभिनेता) | |
जन्म | अजित (अभिनेता) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
हामिद अली खान (२७ जानेवारी १९२२ - २१ ऑक्टोबर १९९८) हे त्यांचे रंगभूमीवरील व चित्रपटातील "अजीत" या नावाने ओळखले जाणारे एक हिंदी अभिनेता होते. जवळजवळ चार दशकांत त्यांनी सुमारे २०० चित्रपटांमध्ये काम केले. अजितने लोकप्रिय बॉलीवुड चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून आपले योगदान दिले आहे, जसे की नास्तिक, बडा भाई, मिलन, बिरादरी(?), आणि नंतर मुगल-ए-आझम आणि नया दौर मध्ये दुय्यम अभिनेता म्हणून.
हैदराबादमधील ऐतिहासिक गोवळकोंडा जवळ जन्मलेल्या हमीद अली खान यांचे शिक्षण वारंगलमध्ये झाले. ते शासकीय कनिष्ठ महाविद्यालय हनामकोंडा (तेलंगाणाचा वारंगल जिल्हा) येथे शिकले होते.अजित हे बशीर अली खानचे सुपुत्र होते जे निजामाच्या सैन्यात होते आणि त्याला धाकटा भाऊ, वाहिद अली खान आणि दोन बहिणी होत्या. हामिदने नायक बनण्यासाठी चित्रपट उद्योगात प्रवेश केला आणि नास्तिक, बडा भाई, मिलन, बिरादरी, ढोलक या चित्रपटात आघाडीच्या प्रमुख कलावंत म्हणून कामे केली आणि त्यानंतर मुगल-ए-आझम आणि नया दौरमधील दुय्यम भूमिका केली. चित्रपट दिग्दर्शक के. अमरनाथ, ज्यांनी बकासूर चित्रपट दिग्दर्शित केला, त्यांनी असे सुचवले की, अभिनेता हमीद अली खानचे बरेच मोठे असलेले नाव बदलून त्याने ते छोटे करावे. आणि हमीदने ते नाव "अजीत" असे केले.