अजयपाल सिंह बंगा
अजय बंगा (इ.स. १९६०:पुणे, महाराष्ट्र) हे मास्टरकार्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी-सीईओ आहेत.
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात बीए झाल्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले.
नेस्ले आणि पेप्सीको कंपन्यांमध्ये दीर्घकाळ विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यानंतर अजय बंगा यांना पेप्सीको कंपनीला भारतीय बाजारपेठेत उतरविण्यात यश आले.
बंगा हे १२ एप्रिल २०१० रोजी मास्टरकार्डच्या सीईओपदी नियुक्त झाले.