अजय लोबो
अजय लोबो यांचा जन्म ११ एप्रिल सन १९९७ पालघर येथील सिडको गावात, सर्वसामान्य कुटुंबात झाला आहे. तर, वसई येथे संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर २०१४ मध्ये त्याने डीजे म्हणून सुरुवात केली. आत्तापर्यंत त्याने अनेक कमर्शिअल तसेच, काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये डीजे म्हणून काम केलं.
अजय लोबो | |
---|---|
जन्म | 11 एप्रिल 1997 पालघर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | डीजे, अभिनेता, लेखक, संगीतकार |
कारकिर्दीचा काळ | 2014- अजून ही कामगिरी चालू आहे |
ख्याती | अभिनेता, डीजे, लेखक |
आई | जया |
पुरस्कार | बेस्ट डीजे ऑफ दि सीजन |
डिजे व्यतिरिक्त त्याने बॉलिवूडमध्ये संगीतकार म्हणून देखील प्रसिद्धी मिळवली. अभिनेत्री आलिया भट हिच्या 'डार्लिंग्स'[१]
सिनेमात, तर अभिनेत्री परिणीती चोप्रा हीच्या 'मुंडा ही चाहिदा' या पंजाबी सिनेमासाठी त्याने संगीत दिले आहे. 'आयआयटी बॉम्बे' या इंस्टिट्युटमध्ये देखील तो बेस्ट डीजे पुरस्काराचा मानकरी ठरला.
तसेच त्याने २०२० मध्ये ‘भेदभाव[२]’ आणि २०२१ मध्ये ‘द नाईट ऑफ मिस्ट्री’[३][४] अशी दोन इंग्लिश भाषेत पुस्तके लिहीली.
संदर्भ
- ^ Bhirwandekar, Harshada. "Marathi DJ Ajay Lobo: मराठमोळा 'डीजे' अजय लोबोची आंतरराष्ट्रीय कामगिरी! पटकावला मानाचा पुरस्कार". Harshada Bhirwandekar.
- ^ Lobo, Ajay (2021). Bhedbhav.
- ^ Sun, Saniul Alom; Lobo, Ajay (2021-06-06). The Night of Mystery (इंग्रजी भाषेत). BookRix. ISBN 978-3-7487-8494-4.
- ^ Lokshahi, Team (2023-12-30). "मराठमोळा अजय लोबो बनला आंतरराष्ट्रीय डिजे; आयपियलमध्ये पटकावला 'बेस्ट डिजे ऑफ द सिझन'चा पुरस्कार". Lokshahi Marathi. 2023-12-31 रोजी पाहिले.