अच्युत बर्वे
अच्युत बर्वे हे एक मराठी लेखक होते. पाककृतीवर पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका मंगला बर्वे या त्यांच्या पत्नी होत.
इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या सुमारास मराठी कथा साहित्यात आमूलाग्र क्रांती घडून आली. गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु. भा. भावे आणि व्यंकटेश माडगूळकर यांनी मराठी कथेला वेगळे वळण दिले आणि ते नवकथाकार म्हणून प्रस्थापित झाले. तरीही आणखी काही समकालीन लेखक कथेच्या क्षेत्रात स्वतःची नाममुद्रा खणखणीतपणे उमटवीत होते. त्यापैकी एक लोकप्रिय कथाकार अच्युत बर्वे होते.
अच्युत बर्वे यांची अनुभवसृष्टी ही स्वतंत्र आणि स्वयंभू आहे. त्यांची कथातंत्रावरची पकड असामान्य आहे. त्यांचे लेखन मिताक्षरी आहे. त्यांचा मानवी स्वभावाचा अभ्यासही मनोवैज्ञानिकालाही नवीन वाटेल असा आहे.
अच्यत बर्वे हे जाहिरात हा आधुनिक व्यापारी जगताचा एक महत्वाचा घटक होय. या व्यवसायात अत्युच्च पदापर्यंत अच्युत बर्वे पोचले होते. त्यामुळे त्यांच्या कथांत जाहिरातीच्या जगाचा सर्व तपशील येतो.
अच्युत बर्वे यांनी लिहिलेली पुस्तके
- आंबट-गोड
- झोका
- पाठमोरी
- मातीचा वास ( कादंबरी)
- सुखदा (कादंबरी)
- हॅंगओव्हर (या संग्रहातील सर्वच कथा जाहिरात-व्यवसायाच्या पार्श्वभूमीवरील आहेत.)
चंदनाचा उंबरठा क्यालिडोस्कोप(कादंबरी)