अचला तांबोळी
डॉ. अचला दिगंबर तांबोळी या एक मराठी लेखिका आहेत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए.(मानसशास्त्र), एम.ए.(समाजशास्त्र) व एम.एड.(शिक्षणशास्त्र) या पदव्या मिळविल्या आहेत. अनेक वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या डॉ. अचला तांबोळी या नागपूर विद्यापीठात पीएच.डीच्या मार्गदर्शिका आहेत. शैक्षणिक पत्रिकांचे तसेच राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रांकरिता त्यांनी निबंधात्मक लेखन केले आहे. त्यांचा एक कवितासंग्रह अजून अप्रकाशित आहे.
प्रकाशित पुस्तके
- अध्ययनकर्त्याचा विकास आणि अध्ययन, अध्यापन प्रक्रिया
- संस्कारदर्पण