अग्गंबाई सूनबाई ही झी मराठी वाहिनीवरील एक दूरचित्रवाणी मालिका आहे.[१]
कलाकार
- गिरीश ओक - अभिजीत राजे
- निवेदिता सराफ - आसावरी अभिजीत राजे
- उमा पेंढारकर - शुभ्रा सोहम कुलकर्णी
- अद्वैत दादरकर - सोहम प्रभाकर कुलकर्णी (बबड्या)
- मोहन जोशी - दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी
- भक्ती रत्नपारखी - मंदोदरी परब (मॅडी)
- राजू बावडेकर - श्री. शेठ
- अन्वित हर्डीकर - शुभम सोहम कुलकर्णी (बबडू)
- गीतांजली गणगे - सुझॅन
- चिन्मय उदगीरकर - अनुराग गोखले
विशेष भाग
- सासू झाली आई. (१५ मार्च २०२१)
- सून बापडी बिचारी, सासूचा बाणा करारी. (१७ मार्च २०२१)
- सासूबाईंनी बांधलाय चंग, सूनबाईंच्या आयुष्याला देणार प्रेमाचा नवा रंग. (१९ मार्च २०२१)
- शुभ्राचा हरवलेला आत्मविश्वास आसावरी परत मिळवून देऊ शकेल का? (२७ मार्च २०२१)
- शुभ्रासमोर नवे संकट. (०३ एप्रिल २०२१)
- अभिजीत राजे उघड करतील का सोहमचे खरे रूप? (०७ एप्रिल २०२१)
- आसावरीचे शुभ्राला वचन, सोहमची चूक सहन नाही केली जाणार एकही क्षण. (१० एप्रिल २०२१)
- शुभ्राने सोहमसाठी ठेवला आहे निर्जळी उपवास. (२० एप्रिल २०२१)
- शुभ्राच्या आयुष्यात झाली अनुरागची एंट्री, करेल का तिला टेंशन फ्री? (०८ मे २०२१)
- आसावरीसमोर शुभ्रा आणेल का सोहमचे सत्य? (१२ मे २०२१)
- अनुरागच्या रूपात बबडूला सापडला नवीन मित्र. (१५ मे २०२१)
- अभिजीत राजे करणार शुभ्राला स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न. (१९ मे २०२१)
- आसावरीच्या साथीने शुभ्राच्या आयुष्यात येणार नवीन पहाट. (२२ मे २०२१)
- कुलकर्णींच्या घरातून शुभ्राला वजा करण्याचा सुझॅनने मांडलाय डाव. (२७ मे २०२१)
- सुझॅनला बळकवायचं आहे शुभ्राचे स्थान, पण सोहमच्या आयुष्यातून सुझॅनला बाद करून शुभ्रा परत मिळवणार का तिचा मान? (०४ जून २०२१)
- सुझॅनने घातलाय शुभ्राला घराबाहेर काढण्याचा घाट, पण आसावरीच्या साथीने शुभ्रा करतेय तिच्या करिअरची नवी सुरुवात. (०८ जून २०२१)
- कुलकर्ण्यांच्या घरात सुझॅनचं पहिलं पाऊल ठरणार का शुभ्रासाठी धोक्याची चाहूल? (१२ जून २०२१)
- घरावर राज्य करण्याची सुझॅनला झाली घाई, नवनव्या युक्त्या करून तिला धडा शिकवणार सूनबाई. (१६ जून २०२१)
- लग्न टिकवण्यासाठी शुभ्राने केली व्रत खूप, वटपौर्णिमेच्या दिवशी आसावरीसमोर येणार सोहमचं खरं रूप. (२४ जून २०२१)
- आसावरी तिच्या निर्णयावर आहे ठाम, घरासोबतच ऑफिसमधूनही केलं सोहमला बेदखल. (२८ जून २०२१)
- घरी परत जाण्यासाठी सोहमने रचलाय डाव, आजोबांच्या मदतीने तो पुन्हा करणार घरात शिरकाव. (०२ जुलै २०२१)
- अधिकारासाठी सोहमने उगारला आसावरीवर हात, सोहमशी नातं तोडून शुभ्रा करणार नवी सुरुवात. (१६ जुलै २०२१)
संदर्भ