अगत्ती
अगत्ती भारताच्या लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील बेट व शहर आहे. ७ किमी लांबीचे व २.७ किमी२ प्रदेश असलेले हे बेट कोचीपासून ४५९ किमी दूर समुद्रात आहे. येथील लोकसंख्या ५,६६७ आहे.
अगत्ती विमानतळ लक्षद्वीपमधील एकमेव नागरी विमानतळ असून येथून कोचीला आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा उपलब्ध आहे.