Jump to content

अखिल भारतीय मराठी गझल संमेलन

ग़ज़ल सागर प्रतिष्ठान नावाची संस्था दरवर्षी गझल संमेलन भरवते.

आत्तापर्यंत झालेली अखिल भारतीय गझल संमेलने--
  • १ले, मुंबई २००१ संमेलनाध्यक्ष : भीमराव पांचाळे
  • २रे, नाशिक २००३ संमेलनाध्यक्ष : डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी
  • ३रे, अमरावती. २००४ अध्यक्षा गझलकवी संगीता जोशी
  • ४थे, औरंगाबाद २००५ संमेलनाध्यक्ष : इलाही जमादार
  • ५वे, वाई २००६ संमेलनाध्यक्ष : डॉ. राम पंडित
  • ६वे, पणजी(गोवा), १४-१५ जानेवारी २०१२, संमेलनाध्यक्ष कवी घनश्याम धेंडे
  • ७वे, आष्टगाव (Asthagaon/Aashatangaon) (तालुका मोर्शी. जिल्हा अमरावती), ९-१०- फेब्रुवारी २०१३, संमेलनाध्यक्ष गझलकार प्रल्हाद सोनेवाने.
  • ८वे, सोलापूर, ११ जानेवारी २०१५ (अध्यक्ष पनवेलचे ए. के. शेख)
  • ९ वे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन वाशी येथे ११ आणि १२ नोव्हेंबर २०१७ या काळात झाले. पत्रकार मधुसूदन नानिवडेकर संमेलनाध्यक्षपदी होते.


७व्या संमेलनातले कार्यक्रम

शनिवार दि. ९ फेब्रुवारी, २०१३ :
सकाळी ११ वाजता उद्घाटन.
दुपारी २.३० वा. 'ग्रामीण जीवन आणि गझल' या विषयावर परिसंवाद.
दुपारी ४.३० वा. 'पहिला मुशायरा'. त्यानंतर विदर्भाची लोकधारा एक झलक, हा कार्यक्रम. यात महादेवाची गाणी, नागोबाची बारी, गोंडी नृत्य गायन, अवधूती भजन, भुलाबाईची गाणी, गवळण, बहिरमबोवाची गाणी (डायका) इत्यादी अभिजात लोककलांची झलक.

रविवार दि. १० फेब्रुवारी, २०१३ :
सकाळच्या पहिल्या सत्रात गझलेसंबंधी विविध विषयांवर मुक्तांगण हा परिसंवाद.
आधुनिक तंत्रज्ञान आणि गझल, स्त्री गझलकारांचे भावविश्व, गझलेच्या भावी वाटचालीची दिशा इत्यादी विषयांवर मुक्तचर्चा.
सकाळी ११.३० वाजता - गझल गायन मैफिल
दुपारी २.३० वाजता - दुसरा गझल मुशायरा
सायंकाळी ५ वाजता - समारोप सोहळा. ग़झलनवाज भीमराव पांचाळे यांचे गझल गायन.

हे सुद्धा पहा

मराठी गझलकार

मराठी साहित्य संमेलने