अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलन
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे ६ मार्च २०१६ रोजी अखिल भारतीय झुंजवादी साहित्य संमेलन झाले. या प्रकारचे हे ६वे संमेलन होते. गोदावरी प्रकाशन, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय (किनवट) आणि खरबीचे कल्याण संशोधन केंद्र खरबी यांच्या संयुक्त पाठिंब्याने हे संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. आबासाहेब वि. कल्याणकर होते.
या साहित्य संमेलनाचा मुख्य विचार झुंजवाद असून देशामध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्यां अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे हे साहित्य संमेलन आहे.
पहा : मराठी साहित्य संमेलने