अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन
अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन हे दर दोन वर्षांनी देशातील वेगवेगळ्या राज्यांत आयोजित करण्यात येते.[१]
२०वे अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन कारवारमधील सदाशिवगड येथील सदिच्छा सभागृहात २९ एप्रिल ते १ मे, इ.स. २०११ या काळात झाले. अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या या संमेलनाचे आयोजन सदाशिवगड येथील कोकणी सांस्कृतिक मंडळाने केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी कोकणी लेखिका सौ. मीना काकोडकर होत्या.
२१वे अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलन मडगाव(गोवा) येथे १५, १६ व १७ फेब्रुवारी, इ.स. २०१३ या काळात. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक आर. एस. भास्कर होते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ दिलीप बोरकर. "कोकणी संमेलनाचे फलित काय?". २५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.