Jump to content

अखलाक मुहम्मद खान

अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार (रोमन लिपी: Akhlaq Mohammed Khan) (१६ जून, इ.स. १९३६ - १३ फेब्रुवारी, इ.स. २०१२) हे उर्दू कवी, हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतकार, प्राध्यापक होते. गमन (इ.स. १९७८), उमराव जान (इ.स. १९८१) या हिंदी चित्रपटांतील उर्दू गीतरचनांमुळे गीतकार म्हणून त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. इ.स. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले[].

जीवन

अखलाक मुहम्मद खानांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून एम.ए. (इ.स. १९६१) केले. त्यानंतर ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्याच उर्दू भाषाविभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. सेवेतून निवृत्त होतेसमयी ते विद्यापीठाच्या उर्दू भाषाविभागाचे विभागप्रमुख होते[].

मृत्यू

१३ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी अलीगढ, उत्तर प्रदेश येथे फुप्फुसांच्या कर्करोगाने खानांचे निधन झाले.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "शहरयार, कुरुप्प यांना ज्ञानपीठ पुरस्कार [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  2. ^ "ज्ञानपीठविजेते शायर शहरयार यांचे निधन". १६ फेब्रुवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे