अक्साई चिन
अक्साई चिन (उर्दू: اکسائی چن; चिनी: 阿克赛钦) हा तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. जो चीनला पाकिस्तानने दिला.हा भूभाग संपूर्णपणे चीनच्या नियंत्रणाखाली असून शिंच्यांग स्वायत्त प्रदेशाच्या होतान जिल्ह्याचा भाग आहे. भारत सरकारने अक्साई चिन भारताच्या जम्मू आणि काश्मिर राज्यातील लडाख जिल्ह्याचा भाग असल्याचा दावा केला आहे. १९५९ सालापासून दोन्ही देशांनी वास्तविक नियंत्रण रेषेचा स्वीकार केला आहे. अक्साई चिन व अरुणाचल प्रदेश हे दोन भारत व चीन देशांमधील सीमावादाचे मुद्दे आहेत.
नाव
अक्साई या तुर्कीक शब्दाचा अर्थ पांढरा झरा असा आहे. चिन शब्दाचा उगम नक्की नाही. चीनी भाषेत याचे लेखन अर्थाप्रमाणे न करता उच्चाराप्रमाणे केले जाते.[१] irrespective of their meaning.
वास्तविक नियंत्रण रेषा
वास्तविक नियंत्रण रेषा (इंग्लिश: Line of Actual Control) ही भारत व चीन देशांच्या वादग्रस्त सीमाप्रदेशामध्ये काढलेली ४,०५७ किमी लांब सीमारेषा आहे. नोव्हेंबर १९५९ मध्ये भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व चिनी पंतप्रधान चौ एन्लाय ह्यांनी ही रेषा स्थापन केली.
संदर्भ व नोंदी
- ^ All these characters can be seen in Chinese Wikipedia's standard transcription table for foreign names, which in its turn is based on the standard transcription guide, 世界人名翻译大辞典 (The Great Dictionary of Foreign Personal Names' Translations), 1993, आयएसबीएन 7-5001-0221-6 (first edition); 1997, आयएसबीएन 7-5001-0799-4 (revised edition)