अक्षौहिणी
प्राचीन भारतातील युद्धशास्त्रात, सैन्य रचनेच्या महत्तम एककास 'अक्षौहिणी' म्हणले जात असे. हे एक सैन्यदल मोजण्याचे एक एकक होते.
एका अक्षौहिणी सैन्यात साधारणपणे खाली नमूद केल्याप्रमाणे सैन्यक्षमता होती.
१ पत्ति = १ गज, १ रथी, ३ अश्व, ५ पदाति(पायी सैनिक)
३ पत्ति = १ सेनामुख
३ सेनामुख = १ गुल्म
३ गुल्म = १ गण
३ गण = १ वाहिनी
३ वाहिनी = १ पृतना
३ पृतना = १ चमू
३ चमू = १ अनीकिनी
१० अनीकिनी = १ अक्षौहिणी
एक अक्षौहिणी सैन्यात एकूण सैन्य:
१,१०,००० पायदळ
६५,००० घोडदळ
२१,८७० हत्तीदल
२१,८७० रथदल
महाभारताच्या युद्धात कौरवांच्या बाजूने ११ अक्षौहिणी तर पांडवाच्या बाजूने ७ अक्षौहिणी सैन्य लढले होते. म्हणजे, एकूण १८ अक्षौहिणी सैन्य कुरुक्षेत्रावर लढाई लढले.[१]
संदर्भ
- ^ श्रीपाद के.चितळे. तरुण भारत, नागपूर-ई-पेपर,आसमंत पुरवणी, दि. ९ मार्च,२०१४, पान क्र. २ "अक्षौहिणी म्हणजे काय?" Check
|दुवा=
value (सहाय्य). १५ मार्च २०१४ रोजी पाहिले.ज्ञानरंजन