अक्षरारंभ
अक्षरारंभ म्हणजे अक्षरांचा आरंभ, हा हिंदूंच्या सोळा संस्कारापैकी बारावा संस्कार आहे. याची शिकवण पुढीलप्रमाणे आहे — बालकाला वयाच्या पाचव्या वर्षी सूर्य उदगयनात असतांना अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा. योग्य दिवशी व वारी, शुभ योग, शुभ पक्ष इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी, गणपती, लक्ष्मी, विष्णू, सरस्वती, वेद, गुरूजन, ब्राह्मण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, ॐ (ओम) लिहून मग दुसरी अक्षरे लिहावी.
संदर्भ
सुलभ जोतिष शास्त्र-लेखक-ज्योतिषी कृष्णाजी विठ्ठल सोमण
हिंदू धर्मातील सोळा संस्कार |
---|
गर्भाधान · पुंसवन · अनवलोभन · सीमंतोन्नयन · जातकर्म · नामकरण · सूर्यावलोकन · निष्क्रमण · अन्नप्राशन · वर्धापन · चूडाकर्म · अक्षरारंभ · उपनयन · समावर्तन · विवाह · अंत्येष्टी |