Jump to content

अक्षरपेरणी

अक्षरपेरणी हे मराठी भाषेत प्रकाशित होणारे वाङ्मयीन नियतकालिक आहे. या नियतकालिकाचे संपादक बाळासाहेब घोंगडे आहेत. १५ ऑगस्ट २०१४ रोजी या नियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. तेव्हापासून हे नियतकालिक प्रत्येक महिन्याला पुणे येथून प्रकाशित होते.

भूमिका

या मासिकाने शेती, माती, नाती आणि संस्कृती यांच्या जतनाची भूमिका घेतली आहे. कृषिकेंद्री जाणीवांचे साहित्य या मासिकातून प्राधान्यक्रमाने प्रकाशित केले जाते.

अक्षरपेरणी नव्या रंगरूपात

अंक- जाने- मार्च २०१७ च्या निमित्ताने...

निकोप नीती आणि कसदार मातीत पडलेले कुठलेही बी दमदारपणे उगवते, फुलते, फळते याचा प्रत्यय अक्षरपेरणीच्या एकूण वाटचालीकडे पाहताना येतो. एका कष्टी शेतकऱ्याची सचोटी आणि चोखंदळ संपादकाची दृष्टी असलेले बाळासाहेब घोंगडे हे एक अजब रसायन आहे. हाती फारसे कांही नसताना ऑगस्ट २०१४मध्ये त्यांनी अक्षरपेरणीचा संकल्प सोडला. तेथून सुरू झालेला हा प्रवास २०१५ चा कविता विशेषांक व २०१६ चा कादंबरी विशेषांकासारखे टप्पे यशस्वीपणे पार करत आज एका नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे.य.

जाने-मार्च १७ च्या अंकाबाबत बोलायचे झाल्यास अंकाच्या अंतरंगाचा टोन अधिक ठाशीव करत बाह्यांगात आमूलाग्र बदल करण्यात आला आहे. आतील कागद, लेखांची सर्व शीर्षके सुलेखन केलेली, लेखकांचे फोटो, पुस्तकांचे फोटो, प्रत्येक लेख ज्यांनी लिहिला आहे त्याचा पत्ता हे या अंकाचे विशेष वैशिष्ट्य आहे. मजकुराला साजेशा लेआऊट हे या अंकाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

'आदिवासी कादंबरीची नव्वदी' हा संजय लोहकरे यांचा लेख व '१९९० नंतरची दलित कविता व जागतिकीकरण' हा संदीप दळवी यांचा लेख आदिवासी -दलित साहित्यावर मुलभूत चिंतन मांडणारे आहेत. १९९०नंतर या दोन्ही प्रवाहांतून येणारे साहित्य विपुल प्रमाणात आहे, तथापि याचा एकत्रित, सुसंबंध विचार अभावानेच होतो; तो येथे पहावयास मिळेल.

द.ता. भोसले व आशुतोष पाटील यांची भाषणे अनुभवाचा विदग्ध अविष्कार असून साहित्यिक दृष्टीला नवा आयाम देण्यासाठी प्रेरक आहेत. सातत्याने इतरांच्या साहित्याची समीक्षा करणाऱ्या समीक्षकांचीही समीक्षा व त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक उलघालीचा विचार होणे आवश्यक असते. त्या दृष्टीने जयप्रभू कांबळे यांनी रणधीर शिंदे यांच्याविषयी लिहिलेला लेख मोलाचा आहे. त्याचबरोबर अंकात एकनाथ पगार, मारुतराव वाघमोडे, मधुकर जाधव, केशव सखाराम देशमुख, विष्णू थोरे यांचे लेखन आहे. सागर जाधव यांच्या सात कविता व अर्चना शिंदे यांच्या पाच कविता त्या कवींचा एकूण काव्यव्यूह समजून घेण्यासाठी महत्त्वाचे आहेत. अक्षरपेरणीचा हा नेटका, सुरेख व कसदार अंक सर्वार्थाने वाचायलाच हवा असा आहे.

ईश्वरचंद्र हलगरे, सहसंपादक- अक्षरपेरणी

अक्षरपेरणी

विशेषांक

अक्षरपेरणीने आजपर्यंत दोन विशेषांक प्रकाशित केले आहेत. यांत २०१५ च्या कवितेची निर्मितीप्रक्रिया या अंकाचा समावेश होतो. यात नव्वदोत्तरी पिढीतील बव्हंश महत्त्वाच्या कवींचा यात सहभाग होता. २०१६ साली कादंबरी निर्मिती प्रक्रिया हा विशेषांक प्रकाशित झाला. राजन गवस, बाबाराव मुसळे, किशोर सानप, बाबा भांड, शेषराव मोहिते या कादंबरीकारांच्या सोबत कृष्णात खोत, महेंद्र कदम, महेश मोरे, बालाजी मदन इंगळे, शिल्पा कांबळे, प्रवीण बांदेकर यांची लेखने यात प्रकाशित झाली. आत्मचरित्रांची निर्मिती या विषयावरती अक्षरपेरणीचा विशेषांक अपेक्षित आहे.

कादंबरीनिर्मितिप्रक्रिया विशेषांक

अनुक्रमणिका खालीलप्रमाणे...

पहिला बिघा

प्रबोधनाच्या चळवळींनी सभोवतालाकडे समग्रपणे पाहण्याची दृष्टी दिली - राजन गवस

- मुलाखतकार : दत्ता घोलप

'गावठाण' निर्मितिप्रक्रिया : संवादचर्चा - लेखक - कृष्णात खोत

मुलाखतकार : आप्पासो बुडके

कादंबऱ्याआडचा कादंबरीलेखक : बाबाराव मुसळे

दुसरा बिघा

असं जगणं तोलाचं : शेतकऱ्याचं जगणं : शेषराव मोहिते

पांगुळवाडा : मन:स्तापासोबत लेखनाचं समाधानही : किशोर सानप

दशक्रिया : एक दमछाक करणारा अनुभव : बाबा भांड

घडई आणि चौथी क्रांती : माणसांच्या जगण्याचाच आलेख : श्रीराम दुर्गे

महिरप आणि मत्स्यालय : आधुनिक शिक्षणव्यवस्थेतील जातीयता : सुहासकुमार बोबडे

चिखलवाटा : संघटनेच्या कार्यकरत्यांची, कुटुंबाची मानसिकता पकडण्याचा प्रयत्न  : सुरेंद्र पाटील

रहबरचा हात धरताना : रफीक सूरज

पडघम ते अश्वमेध : मूल्यऱ्हासाचा एक आलेखच... : रवींद्र शोभणे

शिक्षणक्षेत्रातील भगव्या राजकारणाचा व्हायरस : रवींद्र ठाकूर

गाडा : गावपातळीवरील ताणतणाव अंतःस्वरांसह मांडण्याचा प्रयत्न : जगदीश कदम

गावपांढरी : रुपयाचा खणखणीत बंदा : महेश मोरे

नायकाच्या ढासळलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या बांधणुकीविषयी... : उमेश मोहिते

वाॅन्टेड : उच्च शिक्षणातील दाहक वास्तव : वामन जाधव

अनुभूतीतून चितारलेलं हेलपाटं : सुरेश पाटोळे

भुई भुई ठाव दे : नागरीकरणाने उद्ध्वस्त झालेल्या कृषिव्यवस्थेची अस्वस्थ कहाणी : सीताराम सावंत

नवं काटवन : विविध पातळ्यांवरील जीवतोड संघर्ष

तिसरा बिघा

ऊसतोड कामगारांच्या संप काळातच लेकमात कादंबरीचं सूत्र मला सापडलं : विजय जावळे

झिम पोरी झिम : गावागावांतल्या आजच्या मुलींची कहाणी : बालाजी मदन इंगळे

कापूसकाळची भूमी आणि उगवण : कैलास दौंड

आगळ : तगमग झेलणारी पाऊलवाट : महेंद्र कदम

गुंडाळफळा : मास्तरकीच्या झळा : मिलिंद जाधव

पुरोगामी : धम्म आणि मार्क्सची सम्यक मांडणी : राकेश वानखेडे

झळची अंतःपीडा : एक विलक्षण अनुभूती : सुभाष किन्होळकर

लिहिणाऱ्याच्या आसपासच्या अवकाशाचा शोध, अर्थात चाळेगत ते उजव्या सोंडेच्या बाहुल्या : प्रवीण दशरथ बांदेकर

दप्तर : मुलांच्या शिक्षणाची नेमकी परवड : अशोक कौतिक कोळी

चौथा बिघा

बुढाई : भुईची कादंबरी : प्रतिमा इंगोले

काॅलेज : शिक्षणक्षेत्रातील मूल्यहीनता : छाया महाजन

सतत अस्वस्थ करणारी "मुन्नी" : अरुणा सबाने

संवेदनशील घालमेलीतून उंबरठ्यावरचा नाल लिहिली : मेघा पाटील

निळ्या डोळ्याची मुलगी च्या निमित्ताने...: शिल्पा कांबळे

या बिघ्याचं स्वागतमूल्य : 220

या बिघ्यांची पाने : 192

संपादक

बाळासाहेब घोंगडे

सहसंपादक

ईश्वरचंद्र हलगरे

अतुल चौरे

मुखपृष्ठ व सुलेखन

राजा बडसल

रेखाटने

विष्णू थोरे

संपर्क

बाळासाहेब घोंगडे

संपादक, अक्षरपेरणी

धायरी, बेनकरनगर

पुणे - 411041

नवसुंबरान : 9657502552

विशेष

अक्षरपेरणीच्या प्रत्येक मुखपृष्ठावर ग्रामीण कवीची एक कविता प्रकाशित केली जाते. ईश्वरचंद्र हलगरे आणि अतुल चौरे हे अंकाचे सहसंपादक आहेत. विष्णू थोरे यांचे सुलेखन, रेखाटने आणि मुखपृष्ठ चित्रे प्रत्येक अंकात असतात.

अक्षरपेरणीच्या मुखपृष्ठावरील कविता
▪वर्ष: पहिले
१) ऑगस्ट २०१४- जर माणसं उगवून आली, ऐश्वर्य पाटेकर
२) सप्टेंबर २०१४- माच्यावरून गोफणी, यशवंतराव सावंत
३) ऑंक्टोबर २०१४- बैल आभाळाची कृपा, विठ्ठल वाघ
४) नोव्हेंबर २०१४- ज्वारी, इंद्रजीत भालेराव
५) डिसे.१४ जाने. १५- कोरडे नक्षत्र, प्रकाश होळकर
६) फेब्रु, मार्च १५- न थकता पदराआडून, श्रीकांत देशमुख
७) एप्रिल १५-  तव्यावरची भाकर, प्रकाश किनगावकर
८) मे, जून १५- नवी चळवळ आता कुणब्याची, संतोष पद्माकर पवार
९) जुलै २०१५- संहिता, केशव सखाराम देशमुख

▪वर्ष: दुसरे
1) ऑगस्ट 2015 : अजय कांडर
2) कविता विशेषांक- सप्टे आॅक्टो नोव्हे डिसे.१५
3) जाने-फेब्रु 2016 : कल्पना दुधाळ
4) मार्च एप्रिल १६- कळवळ्याच्या नोंदवहीत सातबारा, अजीम नवाज राही
5) मे जून २०१६- धोंडी धोंडी पाणी, लक्षण महाडीक
6)  जुलै २०१६- भिरूड, शशिकांत शिंदे

▪वर्ष: तिसरे
1) ऑगस्ट-सप्टेंबर २०१६- करेंट, बालाजी मदन इंगळे
2) ऑक्टो-नोव्हें-डिसेंबर १६- कादंबरी विशेषांक
3) जाने ते मार्च 2017 : प्रशांत असनारे

प्रकाशन व वितरण सुविधा

अक्षरवाङ्मय प्रकाशनाच्या वतीने बाळासाहेब घोंगडे यांनी शंभरपेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

अक्षर पुस्तकालय

अक्षर पुस्तकालयात विक्रीसाठी आलेली नवी पुस्तके

लवकरच *अक्षर पुस्तकालय* सुरू होत आहे...या पुस्तकालयात मराठी साहित्यातील सर्व वाड्मयप्रकारातील पुस्तके विक्रीस ठेवणार आहोत. पहिल्या टप्प्यात ५०० महत्त्वाची पुस्तके पुस्तकालयात आणण्याचा मानस आहे...यासाठी खालील काही पुस्तके कालच (!) अक्षर पुस्तकालयात दाखल झालेली आहेत.

संदर्भग्रंथ

मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती : आनंद यादव : 195

ग्रामीणता साहित्य आणि वास्तव : आनंद यादव : 150

ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या : आनंद यादव : 195

सदानंद देशमुखांच्या कादंबऱ्या : लक्ष्मीकांत येळवंडे : 100

मराठी कादंबरी समाजशास्त्रीय समीक्षा : रवींद्र ठाकूर : 400

मराठी कादंबरीचे अंतरंग : नलिनी महाडिक : 100

व्यं.माडगुळकरांचे वाड्मयीन अनुबंध : जितेंद्र गिरासे : 160

महाराष्टातील विस्थापित आणि मराठी कादंबरी : संजय नगरकर : 140

व्यं.माडगूळकरांच्या साहित्यातील लोकतत्त्व : संगीता घुगे : 350

आधुनिक मराठी कादंबरीतील सामाजिकता : शंकर विभुते : 225

साहित्यमूल्यांची समीक्षा : गो.वि.करंदीकर : 125

मराठी ग्रामीण कादंबरी : रवींद्र ठाकूर : 150

आजची कादंबरी : नोंदी आणि निरीक्षणे : रंगनाथ पठारे : 320

ग्रामीण साहित्य मूल्य आणि अभिरुची : नानासाहेब सूर्यवंशी : 210

आत्मचरित्रात्मक कादंबरी वाड्मयप्रकार व वाड्मयचर्चा : महालक्ष्मी मोराळे : 150

साहित्याचीनिर्मिती प्रक्रिया : आनंद यादव : 130

आत्मचरित्रमीमांसा : आनंद यादव : 160

१९६०नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह : आनंद यादव : 200

कादंबरी : विवेचन आणि विश्लेषण : बालशंकर देशपांडे : 60

मराठी ग्रामीण कादंबरी आणि ग.ल.ठोकळ : रामदास रसाळ : 130

साहित्याने मला काय दिले? : संपादन स्नेहल तावरे : 150

आनंद यादव : साहित्य आणि जीवन : एस.एम.कानडजे : 120

ग्रामीण साहित्यिक म.भा.भोसले : रामदास रसाळ : 100

"भिन्नः एक आकलन", पुरुषोत्तम सदानंद तायडे- 170

वैचारिक : ललितगद्य

ग्रामसंस्कृती : आनंद यादव : 170

साहित्यिकाचा गाव : आनंद यादव : 90

साहित्यिक जडणघडण : आनंद यादव : 150

मातीखालची माती : आनंद यादव : 140

कादंबऱ्या

टारफुला : शंकर पाटील : 250

दशक्रिया : बाबा भांड : 200

चिखलवाटा : सुरेंद्र पाटील : 135

तणकट : राजन गवस : 150

आत्मचरित्रे

प्रवास : एका लेखकाचा : व्यं.माडगूळकर : 150

तीन दगडाची चूल : विमल मोरे : 200

बारबाला : वैशाली हळदणकर : 220

कवितासंग्रह

मळ्याची माती : आनंद यादव : 100

मायलेकरं : आनंद यादव : 100

संपर्क

बाळासाहेब घोंगडे

कविता घोंगडे

अक्षरवाड्मय प्रकाशन

धायरी, बेनकरनगर

पुणे - 411041

भ्र. 9657502552

9657751614

ईमेल : aksharwangamay@gmail.com

ता.क.

चांगले काम पिंपळाच्या झाडाखाली बसूनही करता येते, आणि येड्या बाभळीच्या झाडाखाली बसूनही करता येते. चांगले काम घरात, ऑफिसात, मंदिरात बसूनही करता येते, आणि स्मशानात बसूनही करता येते. फक्त ते काम करण्याची इच्छा असली पाहिजे.