Jump to content

अक्षरधारा

अक्षरधारा बुक गॅलरी ही १९९४ पासून महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पुस्तकांची प्रदर्शने भरवणारी पुण्याची नामांकित संस्था आहे.ही संस्था साहित्य व संस्कृतीविषयक विविध उपक्रमांद्वारे वाचकांच्या मनांत पुस्तकांविषयी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वाढावी यासाठी प्रयत्नशील असते.पुण्यात बाजीराव रस्ता आणि डहाणूकर कॉलनी, कोथरूड येथे अक्षरधाराची पुस्तक दालने आहेत.

रमेश राठिवडेकर हे अक्षरधाराचे संचालक आहेत. रघुवीर ढवळे यांनी सुरू केलेल्या ढवळे ग्रंथ यात्रेच्या सुरुवातीपासून ते अखेरीपर्यंत १९८६ ते १९९३ या काळात राठिवडेकर तेथे शिपायापासून ते व्यवस्थापक पदापर्यंत कार्यरत होते. या अनुभावाच्या जोरावरच त्यांनी १३ ऑक्टोबर १९९४ रोजी अक्षरधाराची स्थापना केली. अक्षरधाराने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्रंथप्रदर्शने भरवली. फेब्रुवारी २०१० मध्ये अक्षरधारा बुक गॅलरी नावाने कायमस्वरूपी पुस्तक दालन पुण्यात बाजीराव रस्ता येथे सुरू केले.

उपक्रम

  • ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने लेखक तुमच्या भेटीला, काव्यवाचन परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान, पर्यावरण विषयक अशा अनेक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
  • मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेमधे ग्रंथप्रदर्शन व साहित्यविषयक स्पर्धांचे आयोजन.

पुरस्कार

  • 'अक्षरभारती’ पुणे या संस्थेच्या वतीने ग्रंथप्रसार व प्रचाराच्या कार्याबद्दल जानेवारी २००५ मध्ये 'मराठी गौरव’ पुरस्कार प्रदान.
  • या संस्थेच्या कार्याला मानवंदना म्हणून ’पब्लिशिंग नेक्स्ट इंडस्ट्री’ या जगप्रसिद्ध संस्थेकडून अक्षरधाराला २०१७ सालचा ’बुकशॉप ऑफ द ईयर’ हा सन्मान मिळाला आहे.
  • संस्कृती, नाशिक आयोजित 'सहस्त्रकाची ग्रंथयात्रा’- आदर्श ग्रंथ विक्रेता पुरस्कार
  • वाचन संस्कृती व श्रवण संस्कती वृद्धींगत करण्यासाठी देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान रमेश राठिवडेकर व रसिका राठिवडेकर यांना सन २०१६ साली देण्यात आला.