Jump to content

अक्षरजुळणी

छपाईसाठी खिळ्यांची जुळणी

अक्षरजुळणी म्हणजे मजकूर छापण्यासाठी केलेली टंकांची मांडणी. ह्या अक्षरजुळणीला इंग्रजीत टाइपसेटिंग म्हणतात.

खिळेछाप मुद्रणातील अक्षरजुळणी

अक्षरजुळणीचा प्रारंभ हा मुद्रणकलेच्या विकासासह झाला. पूर्वी मुद्रणासाठी शिशाच्या मुद्रा वा खिळे वापरण्यात येत. ह्या प्रकारच्या मुद्रणात शिशाच्या तुकड्यांवर अक्षरांचे आकार कोरून त्यांच्याद्वारे मुद्रण करण्यात येत असे. ह्या कोरीव तुकड्यांना खिळे, टंक किंवा टाईप असे म्हणत. असे मुद्रण करण्यासाठी विविध अक्षरचिन्हांचे खिळे एकत्र लावून त्यांच्या ओळींचे समूह मुद्रणासाठी तयार करण्यात येत. ह्या प्रक्रियेला खिळेजुळणी किंवा जुळणी असे म्हणत आणि अशी जुळणी करणाऱ्या कारागिरांना जुळारी असे म्हणत.

संगणकाच्या उदयानंतर मुद्रणाचे तंत्र बदलले आणि संगणकावरच अक्षरजुळणी करण्याच्या आज्ञावल्या उपलब्ध झाल्या. मुद्रणाच्या इतिहासात खिळेछाप मुद्रण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

संगणकीय अक्षरजुळणी