Jump to content

अक्षय पेंडसे

अक्षय पेंडसे
जन्मअक्षय विनायक पेंडसे
१२ नोव्हेंबर, इ.स. १९७९ []
मृत्यू २३ डिसेंबर, इ.स. २०१२
मुंबई–पुणे द्रुतगतिमार्ग
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ२००० - २०१२
भाषामराठी
वडील विनायक पेंडसे

अक्षय पेंडसे (१२ नोव्हेंबर, इ.स. १९७९ [] - २३ डिसेंबर, इ.स. २०१२) हा मराठी अभिनेता होता. याने मराठी नाटके, दूरचित्रवाणी, चित्रपट माध्यमांतून अभिनय केला.

जीवन

अक्षय पेंडसे याचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्याने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून एम.ए. पदवी मिळवली []. अभिनयक्षेत्रात जम बसवण्यासाठी पुढे तो मुबंईत स्थायिक झाला. अमोल पालेकर यांच्या कैरी या लघुपटात त्याने भूमिका केली होती. पुढील काळात अमोल पालेकरांच्या ध्यासपर्व चित्रपटात, तसेच उत्तरायण चित्रपटात त्याने भूमिका केल्या होत्या.

कारकीर्द

चित्रपट-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
इ.स. २०००कैरीमराठी
इ.स. २००५कायद्याचे बोलामराठीहर्षवर्धन घोडके
उत्तरायणमराठीसंजय

दूरचित्रवाणी-कारकीर्द

वर्ष (इ.स.)कार्यक्रमभाषाभूमिका/सहभागटिप्पणी
इ.स. २०१२मला सासू हवीमराठीविघ्नेश रत्नपारखी

नाटक-कारकीर्द

वर्ष (इ.स.)चित्रपटभाषाभूमिकाटिप्पणी
सिगारेटमराठी
मि. नामदेव म्हणेमराठी
खरं सांगायचं म्हणजेमराठी

मृत्यू

एका चित्रीकरणाचे काम आटोपून पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना २३ डिसेंबर, इ.स. २०१२ रोजी भाप्रवेनुसार २३:३० वाजायच्या सुमारास अक्षय पेंडसे, त्याच्या सोबत असलेला आनंद अभ्यंकर यांच्या गाडीस मुंबई–पुणे द्रुतगतिमार्गावरील उर्से टोलनाक्याजवळ अपघात झाला []. या वाहनात वाहनचालक, आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, तसेच त्याची पत्नी दीप्ती व मुलगा प्रत्युष (वय १.५ वर्षे) असे प्रवासी होते. या अपघातात अक्षय पेंडसे याचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला; तर अपघातानंतर निगडीतल्या लोकमान्य इस्पितळात उपचारादरम्यान आनंद अभ्यंकर, व पेंडसे याचा मुलगा प्रत्युष या दोघांचा मृत्यू झाला []. अक्षय पेंडसे याची पत्‍नी दीप्‍ती, तसेच कारचालक हे या अपघातात बचावले.

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b c शैलेंद्र परांजपे. "मराठी फिल्म इंडस्ट्री लूझेस टॅलेंटेड ॲक्टर (मराठी: मराठी चित्रपटसृष्टीने गुणी अभिनेता गमावला)". ५ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b "अभिनेते आनंद अभ्यंकर यांचे निधन". 2012-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ५ जानेवारी, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे