अक्षता
अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता. अक्षतांचे अनेक उपयोग धर्मकार्यात सांगितले आहेत. यांचा रंग हळद कुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो.'क्षत' हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ म्हणजे हानी, व्रण, छिद्र / भोक. अ+क्षत असा 'अक्षत' हा शब्द बनला आहे. ज्याला भोक नाही असा अखंड तांदूळ हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो.[१][ संदर्भ हवा ]
उपयोग
देवपूजेत एखादा उपचार नसेल तर त्याऐवजी देवाला अक्षता वाहतात. देवता पीठावरील देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहून त्या त्या देवतेचे आवाहन करतात.अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे. हिदू विवाह पद्धतीत महाराष्ट्रात विवाह लागताना वधू-वरांवर अक्षता टाकतात. अक्षतेतले धान्य हे सुपीकतेचे प्रतीक समजले जात असे.लग्नविधींत अक्षता रोपण हा एक स्वतंत्र विधीही केला जातो.या मंगल अक्षता तांदूळ, ज्वारी,व अन्य कोणत्याही धान्याच्या असू शकतात. प्राचीन पर्शियन विवाह समारंभात तांदळाला महत्त्वाचे स्थान होते.आजही पारशी लोकात लग्न व नवजोत या प्रसंगी अक्षता टाकण्याची प्रथा आहे. ब्राह्मण आशीर्वादाचे मंत्र म्हणून यजमानांना मंत्राक्षता देतात.[२][ संदर्भ हवा ]
हे सुद्धा पहा
- हिंदी विकिपीडियावर अक्षत Archived 2015-10-31 at the Wayback Machine.
- दिव्यमराठी या संकेतस्थळावरील अक्षतांचे महत्त्व सांगणारा लेख