Jump to content

अकोले तालुका

हा लेख अकोले तालुका विषयी आहे. अकोले शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
अकोले तालुका
अकोले is located in अहमदनगर
अकोले
अकोले
अकोले तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्यमहाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हाअहमदनगर
जिल्हा उप-विभागसंगमनेर
मुख्यालय अकोले

क्षेत्रफळ १,५०५.०८ कि.मी.²
लोकसंख्या २९२३१९ (इ.स. २०११)
शहरी लोकसंख्या
साक्षरता दर ५९.१५%
लिंग गुणोत्तर १००३ /

प्रमुख शहरे/खेडी कोतूळ, राजूर
तहसीलदार मुकेेश कांबळे
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघअकोले
पर्जन्यमान १,०५८ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

अकोले तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वांत उंच डोंगरी शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी आहेत.

प्रमुख आकर्षणे

रतनगड, मदनगड, कुलंग, आजोबागड, बितनगड, पाबरगड, विश्राम गड ( पट्टाकील्ला) हरिश्चंद्रगड यांसारखे किल्ले, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असणारे फोफसंडी ही ठिकाणे अकोले तालुक्यात आहेत.

अकोले शहराजवळ अगस्ती आश्रम नावाचे स्थळ आहे. या स्थळी रामाची अगस्तीशी भेट झाली, असे मानले जाते[ संदर्भ हवा ]. या तालुक्यातल्या रतनवाडी गावात अमृतेश्वर मंदिर नावाने ओळखले जाणारे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे मंदिर आहे.

धरणे

प्रवरा नदीवर इ.स. १९१६ साली बांधण्यात आलेले भंडारदरा धरण अकोले तालुक्यात आहे. तसेच प्रवरेवरच बांधले जात असलेले ७.८ टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फीट, १ खर्व घनफूट) क्षमतेचे निळवंडे धरण आहे. अकोले तालुक्यात १२५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प असलेले घाटघर धरणही अकोले तालुक्यात आहे.

रंधा धबधब्याशेजारी कोदणी प्रकल्प नावाचा एक जलविद्युत प्रकल्प आहे. या जलविद्युत प्रकल्पाची स्थापित क्षमता ३४ मेगावॅट आहे. हा प्रकल्प डॉडसन कंपनीला ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर चालण्यासाठी देण्यात आला आहे.

४) बलठण धरण :

अकोले तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील बलठण धरण हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणुन नव्याने ओळखले जाणारे प्रेक्षणीय स्थळ आहे . बलठण व पुरुषवाडी यां गावांच्या स्थिरावरील कुरकुंडी नदी आता बलठण धरण नावाने ओळखली जाते , माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या कारकीर्दित बांधण्यात आलेले हे बलठण धरण असुन येथील देखावा पाहण्यासाठी पावसाळ्यात गिर्यारोहकांची भ्रमंती बघायला मिळते.

अकोले तालुक्यातील गावे

[]

तांभोळ

हे सुद्धा पहा

  • जगदंबामाता मंदिर, टाहाकरी

बाह्य दुवे

  • "अहमदनगर जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावरील अकोले तालुक्याविषयीची संक्षिप्त माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". 2016-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-07 रोजी पाहिले.