अकोला विमानतळ
अकोला विमानतळ | |||
---|---|---|---|
आहसंवि: AKD – आप्रविको: VAAK | |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | महाराष्ट्र शासन | ||
प्रचालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
कोण्या शहरास सेवा | अकोला | ||
स्थळ | अकोला, महाराष्ट्र, भारत | ||
समुद्रसपाटीपासून उंची | ९९९ फू / ३०४ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 20°41′56″N 77°3′31″E / 20.69889°N 77.05861°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
फू | मी | ||
१०/२८ | ? | १४००[१] | काही भाग कॉंक्रिट, तर काही भाग डांबरी धावपट्टी |
अकोला विमानतळ(आहसंवि: AKD, आप्रविको: VAAK) हे महाराष्ट्र राज्याच्या अकोला शहरातील विमानतळ आहे. यास 'शिवणी विमानतळ' या नावाने देखील ओळखले जाते कारण ते अकोल्याच्या पूर्वेस असलेल्या शिवणी या गावात स्थित आहे.हा विमानतळ महाराष्ट्रातील २६ विमानतळांपैकी एक आहे.
या विमानतळाची स्थापना १९४३ साली झाली.प्रथमतः याच्या धावपट्टीची लांबी ९०० मीटर होती. २००९चे दरम्यान ती लांबी १४०० मीटर करण्यात आली.[२]
विमानसेवा व गंतव्यस्थान
सध्या येथे कोणतीही विमानसेवा नाही. सध्या ह्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून त्यासाठी तेथील कृषी विद्यापिठाची ६० एकर जमिन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.[३] त्यासाठी विद्यापीठ व बाजुच्या गुढधी, शिवर, बाभूळगाव इ. गावातील जमिनी घ्याव्या लागतील. हे विस्तारीकरण झाल्यास अकोला, यवतमाळ, वाशिम,बुलढाणा, हिंगोली इ. जिल्ह्याना त्याचा फायदा होईल.
संदर्भ
- ^ तरुण भारत -ई-पेपर- दि.२३/१०/२०१३, पान क्र. ५ (लेख मथळा: कृषी विद्यापीठाच्या जागेवर विमानतळ कशाला?) दि. २३/१०/२०१३ रोजी २१.१५ वा जसे दिसले तसे.
- ^ तरुण भारत -ई-पेपर- दि.२३/१०/२०१३, पान क्र. ५ (लेख मथळा: कृषी विद्यापीठाच्या जागेवर विमानतळ कशाला?) दि. २३/१०/२०१३ रोजी २१.१५ वा जसे दिसले तसे.
- ^ तरुण भारत -ई-पेपर- दि.२३/१०/२०१३, पान क्र. ५ (लेख मथळा: कृषी विद्यापीठाच्या जागेवर विमानतळ कशाला?) दि. २३/१०/२०१३ रोजी २१.१५ वा जसे दिसले तसे.
बाह्य दुवे
- विमानतळ माहिती VAAK वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.
- एव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, AKD या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा
- भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या संकेतस्थळावर अकोला विमानतळ Archived 2008-03-23 at the Wayback Machine.