Jump to content

अंशकालीन कर्मचारी

अंशकालीन करार हा एक प्रकारचा रोजगार आहे जो पूर्ण-वेळ नोकरीपेक्षा आठवड्यातून कमी तासांचा असतो. यामध्ये असणारे कर्मचारी क्वचित पाळीमध्ये काम करतात. शिफ्ट अनेकदा बदलण्यात येतात. आठवड्यातून ३० तासांपेक्षा कमी काम केल्यास कामगारांना अर्थ वेळ/तासिका तत्व अथवा अंशकालीन कामगार/कर्मचारी मानले जाते. कामगार अथवा कर्मचारी सरकारी सेवेत असल्यास त्यांना अंशकालीन कर्मचारी असे म्हणतात. उदा.सी.एच.बी.पदावरती काम करणारे या मध्ये येतात तशी नोंद संच मान्यता मध्ये दिसतात. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मते, युनायटेड स्टेट्स वगळता, बहुतेक विकसित देशांमध्ये गेल्या २० वर्षांमध्ये अंश-काळातील कामगारांची संख्या एक चतुर्थांशापर्यंत वाढली आहे.अर्धवेळ काम करण्यासाठी अनेक कारणे आहेत, जसे की ते काम करण्याची इच्छा असणे, नियोक्त्याने आपले तास कमी केले आणि पूर्ण-वेळ नोकरी मिळविण्यात अक्षम. इंटरनॅशनल लेबर ऑर्गेनाइझेशन कन्व्हेन्शन १७५ ची अशी आवश्यकता आहे की अर्धवेळ कामगारांना पूर्ण-वेळ कामगारांप्रमाणेच वागणूक देण्यात यावी.