Jump to content

अंबिका धुरंधर

अंबिका धुरंधर

जन्म४ जानेवारी १९१२
मृत्यू३ जानेवारी २००९
कार्यक्षेत्रचित्रकला
प्रशिक्षणसर ज.जी. कलामहाविद्यालय
वडीलमाधव विश्वनाथ धुरंधर

अंबिका महादेव धुरंधर (४ जानेवारी १९१२ - ३ जानेवारी २००९) ही मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून जीडी आर्टचा (चित्रकला) अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पहिल्या काही महिलांपैकी एक होती.[] ती कलाकार एम. व्ही. धुरंधर यांची मुलगी होती, जे सर जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी, शिक्षक आणि पहिले भारतीय संचालक होते.

तिने आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चित्रे काढली, त्यांच्या कलाकृतींच्या विशाल संग्रहाची काळजी घेतली आणि आयुष्यभर त्यांच्या शैलीत्मक प्रभावाखाली जगली. परिणामी, सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधील शैक्षणिक कलेच्या सुवर्णकाळाचा प्रभाव तिच्यावर आयुष्यभर राहिला. []

जीवन आणि शिक्षण

सुरुवातीला, धुरंधर कुटुंब ठाकूर यांच्या घरात राहत होते. अंबिका आपल्या घराजवळ असलेल्या नौरोजी रस्त्यावरील कर्वे विद्यापीठाच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकत होती. काही दिवसांनी तिची शाळा गिरगाव येथील दुसऱ्या इमारतीत स्थलांतरित झाली. जेव्हा ते ठाकूरच्या घरी राहत होते, तेव्हा ती शेजारी राहणाऱ्या इतर मुलींसोबत गिरगावला जायची. तथापि, त्यांच्या खार येथे स्थित अंबासदन या निवासस्थानी स्थलांतरित झाल्यानंतर, धुरंधर कुटुंबाला वाटले की तिला एकटीला रेल्वे आणि ट्रामने गिरगावला पाठवणे धोक्याचे आहे. तोपर्यंत तिचे सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यानंतर तिचे इंटरमिजिएट इयत्तेपर्यंतचे शिक्षण घरीच पूर्ण झाले. अंबिकाचा कल पहिल्यापासून कलांकडे असल्याने तिच्या वडिलांनी स्कूल ऑफ आर्टमध्ये तिचा दाखिला करून घेतला. []

अंबिका पहिल्या वर्षाच्या चित्रकला वर्गात सामील झाली असून त्यानंतर चित्रकलेच्या सर्व परीक्षेत ती उत्तीर्ण झाली. १९३१ मध्ये आपली पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून ती दुसरी आली आणि असे करणारी दुसरी महिला ठरली. अँजेला त्रिंदाडे त्यावेळी तिच्या समवयस्कांपैकी एक होती. [] ती अँटोनियो झेवियर त्रिंदाडे यांची मुलगी होती, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षिक होते. पुढे जाऊन, अंबिका रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स, लंडनची फेलो देखील बनली. []

कारकीर्द आणि प्रभाव

तिच्या वडिलांप्रमाणेच अंबिकानेही आपल्या चित्रांमध्ये भारतीय पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांचे चित्रण केले. [] तिने आकृती रचनांमध्ये प्रभुत्व मिळवले असून तिच्या निर्मितीमध्ये मानवी आकृत्यांच्या विविध अभिव्यक्तींचा वापर होत असत. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात प्रदर्शित झालेली तिची चित्रे 'शिवराज्याभिषेक' आणि 'देवी अंबिका तिच्या योगिनी सह' ही याची साक्ष होती. या कार्यक्रमात तिला सोसायटीतर्फे रौप्य पदक प्रदान करण्यात आले होते. []

या यशानंतर, तिच्या चित्रांचे प्रदर्शन दिल्ली, बंगळुरू, म्हैसूर, कोल्हापूर आणि शिमला यासारख्या अन्य ठिकाणी करण्यात आले. [] या प्रदर्शनांमध्ये तिला अनेक पुरस्कार मिळाले असून तिला समीक्षकांची प्रशंसा ही मिळाली. []

बडोदा स्पर्धा

१९३५ मध्ये बडोद्याच्या महाराजांच्या राज्याभिषेकाच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, प्रजाजनांतर्फे त्यांना सुवर्ण-रौप्य मंजूषेतून मानपत्र देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये या मंजूषेचे डिझाइन आमंत्रित केले होते. [] अंबिकाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या वैशिष्ट्यांनुसार तिची रेखाचित्रे पाठवून या स्पर्धेत भाग घेतला. प्राप्त झालेल्या असंख्य नोंदींमधून, तिची रचना दोन निवडलेल्या निर्मितींमध्ये होती. तिला रु.५०० चे बक्षीस देण्यात आले असून वडिलांसह महाराजांना भेटण्याची संधी ही मिळाली. []

भारत आणि परदेशात प्रवास

अंबिकाने आपल्या कुटुंबासह भारतात आणि नंतर परदेशात स्वतंत्रपणे प्रवास केलं होतं. अनेक संस्थानांनी तिच्या वडिलांना कमिशन केलेले कलाकृती तयार करण्यासाठी बऱ्याच वेळा आमंत्रित केले होते. बडोदा, ग्वाल्हेर, इंदूर, कोल्हापूर इत्यादी राजघराण्यांची निमंत्रणे स्वीकारल्यानंतर तिला तिच्या कुटुंबासह या संस्थानांमध्ये प्रवास करण्याची आणि राहण्याची ही संधी मिळाली. []

अंबिकाने आपल्या युरोपीय दौऱ्यात लंडनमधील मादाम तुसाद प्रदर्शनाला भेट दिली असून या प्रदर्शनात, तिने हिटलर, एबिसिनियन हेले सेलासी, मुसोलिनी, गांधी, स्टॅलिन,नेपोलियन, ब्रिटिश राजघराण्यासारख्या अनेक व्यक्तिमत्त्वांची जीवन-आकाराची शिल्पे पाहिली होती. []

वडिलांच्या मृत्यूनंतरचे जीवन

१९४४ मध्ये तिच्या वडिलांच्या निधनानंतर, तिने त्यांच्या कलाकृतींची देखरेख करण्याची जबाबदारी घेत असून त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्या प्रदर्शनासाठी ठेवल्या. १९४९ मध्ये, तिने मुंबईतील खार भागात धुरंधर कलामंदिर सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना कलाचा शिक्षण दिले. []

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. या कार्यक्रमांसाठी तिने काही कलाकृतीही बनवल्या होत्या. [१०]

अंबिका यांनी १९३० ते १९५० पर्यंतच्या प्रवासाच्या आठवणी लेखनात जतन केले असून या कथांवर आधारित माझी स्मरणचित्रे हे पुस्तक २०१० मध्ये तिच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते. हे पुस्तक कलेचा इतिहास संग्रहित करत असून संस्थानांचा काळातील कला शिक्षण, कला उत्पादन, व्यवसाय आणि व्यापार यांचे वर्णन करणारी एक महत्त्वाची सामग्री म्हणून उपलब्ध आहे.

ती अविवाहित असून खार येथील अंबासदनात एकटीच राहत असत. २००९ मध्ये वृद्धापकाळात आजारपणामुळे तिचे निधन झाले. []

संदर्भ

  1. ^ Dhurandhar, Ambika (August 2010). Majhi Smaranchitre (Marathi भाषेत). Majestic Publishing House. p. 43.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b c Encyclopaedia visual art of Maharashtra : artists of the Bombay school and art institutions (late 18th to early 21st century). Suhas Bahulkar, Pundole Art Gallery. Mumbai. 2021-03-02. ISBN 978-81-89010-11-9. OCLC 1242719488. 2022-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-04 रोजी पाहिले.CS1 maint: others (link)
  3. ^ Dhurandhar, M. V. (August 2018). Kalāmandirātīla ekecāḷīsa varshe : 8 Jānevārī 1890 te 31 Jānevārī 1931 (Marathi भाषेत). Deepak Ghare. Mumbai: Majestic Publishing House. p. 174. ISBN 978-93-87453-24-1. OCLC 1097364249. 2022-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-04 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ a b c शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला (Marathi भाषेत). मुंबई: साप्ताहिक विवेक, हिंदुस्थान प्रकाशन संस्था. 2013. pp. 241–243. 2022-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-04 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Gallery for Modern and Contemporary Indian Art". www.visionsarts.com. 2022-03-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-04 रोजी पाहिले.
  6. ^ a b c "धुरंधर, अंबिका महादेव". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-04 रोजी पाहिले.
  7. ^ "त्या दोघीजणी". Maharashtra Times. 2022-03-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-04 रोजी पाहिले.
  8. ^ Dhurandhar, Ambika (2010). Majhi Smaranchitre (Marathi भाषेत). Mumbai: Majestic Publishing House. pp. 54–55, 62.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ Dhurandhar, Ambika (2010). Majhi Smaranchitre (Marathi भाषेत). Mumbai: Majestic Publishing House. p. 107.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "Pinching Salt – B is for Bapu" (इंग्रजी भाषेत). 2022-03-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-03-04 रोजी पाहिले.