अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य
अंबाबरवा अभयारण्य इंग्रज काळापासून अंबाबारवा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यास महाराष्ट्र शासनाने ९ एप्रिल १९९७ च्या आदेशान्वये अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. अंबाबरवा अभयारण्य बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तर पूर्वेला सातपुड्याच्या कुशीत विसावलेले आहे. या अंब्याबारव्याला जातांना बदरारा, चिंचखाडी, पिंपळखेड असे अनेक निर्सगरम्य ठिकाण लागतात. सुंदर सुर्यास्त दिसतो. समुद्रसपाटी पासून हे ठिकाण उंचीवर आहे. [१]
भौगोलिक आणि वन्यजीव
महाराष्ट्र शासनाने ९ एप्रिल १९९७ च्या आदेशान्वये अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. १२७.११० चौरस किलोमीटरचे डोंगरदऱ्यांनी व्यापलेले हे क्षेत्र संरक्षित झाल्याने येथील समृद्ध जैवविविधता जपली गेली. सातपुडाच्या जंगलात विविध वृक्षांच्या जाती आहेत. मोहा, सागवन, टैमरू, अंजन पिंपळ, वड, आळी, बेल, कविट, चिंच, जामून, आंबा, घामोडा, साल, निंब, इत्यादी झाडे असून अनेक कंदमूळे आहेत. कनिहाकन्द, कुन्दरी विरी, बरहा, मिस्वकन्द, शंकरकन्द, रामकन्द, कलाकन्द जामिकन्द इ. त्याचप्रमाणे सातपुड्यात वाघ, हरीण, रानडूकर, सांबर, निलगाय, अस्वल, रोही हे प्राणी आहेत तर मोर, लांडोर, तितर, कबुतर, कोकिळा, पोपट मैना, पारवा, होलगी, इ. पक्षी जंगलात आहेत अनेक वनौषधी उपलब्ध आहेत.[२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "इंग्रज काळापासून अंबाबारवा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे" (PDF). zpbuldhana.maharashtra.gov.in (Marathi भाषेत). 10 November 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "वन पर्यटन : अंबाबरवा अभयारण्य". loksatta.com (Marathi भाषेत). 9 August 2017. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)