अंबादेवी मंदिर
अंबादेवी मंदिर हे सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. मंदिर अमरावती शहराच्या मध्यभागी आहे.[१] अमरावतीची ही अंबादेवी विदर्भाची कुलदेवता आहे.[२]
अंबादेवी मंदिराचा इतिहास
अंबादेवी मंदिर अतिपुरातन असून इ.स. १८७० चे हैद्राबाद गॅझेटीयर नुसार हजारो वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे. एकोणिसावे शतकाचे पुर्वार्धात अंबादेवीची मुर्ती एका लहानशा हेमाडपंथी मंदिरात होती असे जुने लोक सांगतात. अगोदरचा इतिहास काळाचे उदरात गडप झाल्याने कल्पना येत नाही. माता अंबादेवीची मुर्ती वालुकेची असून अतिपुरातन असल्याची संशोधकांचे मत आहे. विदर्भ नावाचे राजाचे कुळामधील राजा भिष्मकाची राजधानी कुंडीनप्र (कौंडण्यप्र) होती व अंबादेवी कुलदैवत होते. या मंदिरातुनच भिष्मकपुत्री रुक्मिणीचे श्रीकृष्णाने हरण करून पाणी ग्रहण केल्याची पूर्वापार चालत आलेली मान्यता आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्नाची पत्रिका माते अंबिकेच्या नावाने आली होती असे सांगतात.[३]
अतिथी गृहाची दोन मजली इमारत इ.स. १८९० साली तर मारुती मंदिर व दुर्गा देवी मंदिराची जागा इ.स. १८९५ साली बांधण्यात आली. मंदिराची दोन शिखरे इ.स. १८९६ साली बांधली आहेत. सोन्याचा मुलामा असलेला मूळ चांदीचा प्रसन्न मुखवटा इ.स. १९०५ मधे तयार करण्यात आला आहे. अंबादेवीचे मूर्तीस मंगळवार, पौर्णीमा, अमावस्या, नवरात्र व महत्वाचे सणाचे दिवशी मुखवटा व संपूर्ण सुवर्णालंकार, जडजवाहीर चढविल्या जातात. इ.स.१९२४ साली परदेशी मालावर बहिष्कार घालण्याचे आंदोलनात मंदिराने विदेशी साखरेपासून बनविलेली मिठाई मंदिरात न आणण्याचा ठराव केला होता. इ.स. १९९५ साली मंदिराचे सभागृहाचा जिर्णोद्धार करण्यात आला.[४]
हे मंदिर भारतातील प्राचीन शक्ती पिठांपैकी एक असून जगन्नाथ रुक्मिणीचे माहेर,[५] श्रीकृष्णाचे सासर आणि अनंत दुखितांचे सुखस्थान, निराश्रितांचे आश्रयस्थान आणि सर्वांचे श्रद्धास्थान असे हे जगदंबेचे मंदिर आहे.
संदर्भ व नोंदी
- ^ "अंबादेवी मंदिर". maharashtratourism.gov.in (Marathi भाषेत). 10 November 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "अमरावतीची 'ही' अंबादेवी विदर्भाची कुलदेवता!". jaimaharashtranews.com (Marathi भाषेत). 10 November 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "या देवीच्या मंदिरात शिवरायांनी पाठवली होती राज्यभिषेकाची निमंत्रण पत्रिका". divyamarathi.bhaskar.com (Marathi भाषेत). 10 November 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "देवी विशेष : विदर्भातील देवीची मंदिरे". loksatta.com (Marathi भाषेत). 5 October 2018. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "रुक्मिणीचे माहेर ..! कौंडण्यपूर...!". navarashtra.com (Marathi भाषेत). 21 August 2022. 10 November 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)